शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

तालुक्यातील तीन शाळा होणार डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:04 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, खासगी शाळांच्या तुलनेत ते कुठेही मागे राहू नये, त्यांना सुद्धा डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण बिरसी विमानतळच्या वतीने सीएसआर निधी अंतर्गत गोंदिया तालुक्यातील बिरसी, खातिया, कामठा येथील तीन शाळा डिजिटल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसीएसआर अंतर्गत ४५ लाखांचा निधी : भारतीय विमान प्राधिकरण

लोकमत न्यूज नेटवर्कखातिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, खासगी शाळांच्या तुलनेत ते कुठेही मागे राहू नये, त्यांना सुद्धा डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण बिरसी विमानतळच्या वतीने सीएसआर निधी अंतर्गत गोंदिया तालुक्यातील बिरसी, खातिया, कामठा येथील तीन शाळाडिजिटल करण्यात येणार आहे. यासाठी प्रती शाळा १५ लाख रुपये याप्रमाणे ४५ लाख रुपयांचा निधी भारतीय विमान प्राधिकरण बिरसी विमानतळातर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.खासगी कंपन्याना सीएसआर अंतर्गत विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो. सीएसआर निधीतून प्राप्त होणाऱ्या निधीतून महाराष्टÑात जलयुक्त शिवार अभियानासारखी योजना यशस्वी झाली. याच निधीतून आता पायाभूत व शैक्षणिक सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. भारतीय विमान प्राधिकरणा अंतर्गत बिरसी येथे विमानतळ उभारण्यात आले आहे. या आंतरराष्टÑीय दर्जाच्या विमानतळामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.यामुळे भविष्यात रोजगार संधीत सुध्दा वाढ होण्याची शक्यता आहे. याच विमानतळ प्राधिकरणाने आता गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. बिरसी, खातिया, कामठा येथे जिल्हा परिषदेची शाळा असून यात परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहे.खासगी शाळांप्रमाणे डिजिटल शिक्षण व त्यासारख्या सुविधा या शाळांमध्ये सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सध्याच्या स्पर्धेच्या युगात मागे असल्याचे चित्र आहे. मात्र हे चित्र बदलण्यासाठी बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे आता पुढाकार घेतला आहे.सीएसआर अंतर्गत या तिन्ही शाळांना प्रत्येकी १५ लाख रुपये देवून या शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याची मोठी मदत होणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात उंच भरारी घ्यावी. शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेही मागे राहू नये, यासाठी त्यांना डिजीटल शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगिन विकास हाच भारतीय विमान प्राधिकरण बिरसी विमानतळाचा मुख्य उद्देश आहे.- सचिन बी. खंगारी, बिरसी विमानतळ, संचालकशिक्षकांना प्रशिक्षणखातिया येथे जिल्हा परिषद शाळेत कामठा-खातिया-बिरसीच्या सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना डिजीटल शिक्षणासंबंधी नुकतेच एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. हे शिक्षक विद्यार्थ्यांना डिजिटल अभ्यासक्रमाचे धडे देणार आहेत. त्यामुळे या भागातील विद्यार्थी देखील खासगी शाळांप्रमाणे स्मार्ट होणार आहेत.

टॅग्स :Schoolशाळाdigitalडिजिटल