शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मोटारपंप चोरणाऱ्या टोळीतील तिघे जण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By नरेश रहिले | Updated: March 10, 2024 18:51 IST

शेतकऱ्यांनी शेतात धानपिकाला पाणी देण्यासाठी लावलेल्या मोटार पंपांना टार्गेट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे.

गोंदिया: शेतकऱ्यांनी शेतात धानपिकाला पाणी देण्यासाठी लावलेल्या मोटार पंपांना टार्गेट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. पथकाने या टोळीतील तिघांना अटक केली असून ही कारवाई शनिवारी (दि.९) करण्यात आली. त्या आरोपींजवळून एक लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चोरी, घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा तसेच मोटारसायकल व मोटारपंप चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्हा पोलिसांना दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात वाढती चोरी, घरफोडीचे प्रमाण पाहता विशेषतः मोटारसायकल व मोटारपंप चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रयत्न करीत आहे. यासाठी पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथक तयार केले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे गुन्हेगारांची माहिती काढण्याचे काम सुरू असतानाच गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी मोटारपंप चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार जितेंद्र रुपचंद पटले (३५), आकाश राधेश्याम पटले (२७), रुपेश रमेश उके (३३, तिघे रा. धादरी, ता. तिरोडा) यांना ताब्यात घेतले. विचारपूस केली असता तिघांनी आपला गुन्हा कबूल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक लबडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, हवालदार इंद्रजित बिसेन, सुजित हलमारे, शिपाई संतोष केदार, चालक पोलिस शिपाई घनश्याम कुंभलवार यांनी केली आहे. आठ मोटारपंप व एक मोटारसायकल जप्तमोटारपंप चोरी प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली व त्यानंतर त्यांची अधिक तपास सुरू केला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी जितेंद्र पटले याच्याकडून चार मोटारपंप किंमत २९ हजार रुपये, तसेच आकाश पटले याच्याकडून चार मोटारपंप व एमएच ४०-एस २९१२ क्रमांकाची मोटारसायकल असा ८७ हजार रुपयांचा माल असा एकंदर एक लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त केला. दोन महिन्यांपासून पोलिस होते मागावरतिरोडा तालुक्यातील ग्राम सालेबर्डी, धादरी, उमरी, सरांडी व तिरोडा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज मोटारपंप चोरीच्या घटना मागील दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात घडत होत्या, यामुळे स्थानिक गुन्हे शाखा मागील दोन महिन्यांपासून त्याकडे बारकाईने नजर ठेऊन होते. अशातच गुप्त माहिती व पथकाच्या प्रयत्नाने टोळीचा पर्दाफाश करता आला.

टॅग्स :gondiya-acगोंदियाtheftचोरी