लोकमत न्यूज नेटवर्क गोदिया: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वर्षभरापूर्वी वनविभागाने वाघाचे संवर्धन स्थानांतरण हा उपक्रम राबवून तीन वाघिणी सोडल्या होत्या या वाघिणी आता व्याघ्र प्रकल्पात चांगल्याच स्थिरावल्या आहेत. यापैकी एनटी-२ वाघिणीने तीन बछडधांना जन्म दिला आहे. या वाधिणीचे तिच्या बछड्यांसह खेळतानाचे व्हिडीओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होत आहेत. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तीन नवे पाहूणे आल्याने प्रकल्पाच्या वैभवात भर पडली आहे.
व्याघ्र संवर्धनासाठी महाराष्ट्र वनविभागाने आतापर्यंत एकूण तीन वाघिणी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडल्या आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात एनटी-१ व एनटी-२ या वाघिणीला २० मे २०२३ रोजी, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एनटी-३ वा वाघिणीला ११ एप्रिल २०२४ रोजी नागझिरा वन्यजीव अभयारण्यात निसर्गमुक्त करण्यात आले होते. यापैकी एनटी-२ वाघिणीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये सहजपणे आपला अधिवास निर्माण केला. सद्य:स्थितीत ट्रॅप कैमेन्याद्वारे एनटी-२ वाघिणीच्या हालवालीवर लक्ष ठेवले आहे. एनटी-२ वाधिणीचे प्रथमच तिच्या ३ बछड्यांसह रानगव्याची शिकार करतानाचे छायाचित्र ट्रॅप कॅमे-यात कैद झाले आहे.
यांची भूमिका राहिली महत्त्वपूर्ण या यशामध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य नागपूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पूर्व) नागपूर यांच्या मार्गदर्शनात तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदियाचे क्षेत्र संचालक जयरामे गौडा आर, साकोलीचे उपसंचालक पवन जैफ, उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, विभागीय वनाधिकारी अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, व्ही. के. भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी सपना टेंभरे, दिलीप कौशिक व वनविभागातील इतर कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
वाघिणीच्या हालचालींवर व्हीएचएफ, जीपीएस कॉलरने लक्ष एनटी-२ वाघिणीच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी व्हीएचएफ जीपीएस कॉलर आणि कॅमेरा टॅप यासारखी आधुनिक साधने वापरण्यात आली होती. ज्यात संनियंत्रण रूमची महत्त्वाची भूमिका राहिली.
"एनटी-२ वाघिणीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी व्हीएचएफ/जीपीएस कॉलर आणि कॅमेरा ट्रॅप यासारखी आधुनिक साधने वापरण्यात आली होती. एनटी-२ वाघिणीच्या बछड्यांच्या जन्मामुळे प्रकल्पाच्या उद्दिष्टांना नवे यश व दिशा प्राप्त झाली आहे." - पवन जैफ, उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्र, साकोली