शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील तीन सराईत गुंडांना तीन महीन्यासाठी केले तडीपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 23:07 IST

सण उत्सवाच्या निमीत्ताने शहर पोलिसांची कारवाई: गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्ह्यातून केले तडीपार.

नरेश रहिले, गोंदिया: गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य लोकांचे मनात दहशत, भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गोंदिया शहरातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला भयमुक्त जिवन जगता यावे याकरीता गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षकांनी तिन्ही सराईत गुंडांना गोंदिया, भंडारा, आणि बालाघाट जिल्हयातून तडीपार करण्याकरीता कलम ५६ महाराष्ट्र पोलीस अधिनीयमान्वये उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी पर्वणी पाटील यांनी प्रस्तावाची शहानिशा व चौकशी करून त्या तिघांना तडीपार केले.

अमित ऊर्फ गुलशन महेंद्रसिंग चिंडाले (२६), सुमित महेन्द्रसिंग चिंडाले (२८) दोन्ही रा. दसखोली मरघट रोड गोंदिया व शुभम ऊर्फ हग्णू ऊर्फ मास जनुजी चौधरी (२०) रा. सुंदरनगर, गोंदिया अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना २९ जुलै रोजी तीन महिन्याकरीता गोंदिया, भंडारा व बालाघाट या जिल्हयातून तडीपार केले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, दिनेश लबडे, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर, प्रकाश गायधने ,दुर्गेश तिवारी, दिनेश बिसेन, पोलीस हवालदार निशिकांत लोंदासे यांनी कारवाई केली आहे. या आरोपींची ही पार्श्वभूमीआरोपी अमित ऊर्फ गुलशन महेंद्रसिंग चिंडाले याच्या विरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, सामूहीक बलात्कार, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा घालण्याची पूर्व तयारी, लोकसेवकावरील हल्ल्ला, इच्छापूर्वक दुखापत, अवैध शस्त्र बाळगणे, दरोडा, अपहरण, दुखापत, नुकसान काम आगळीक करणे, धमकी, समान उद्देश, विनयभंग या सारखे १२ गंभीर गुन्हयांची नोंद आहे. आरोपी सुमित महेन्द्रसिंग चिंडाले याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे घरफोडी, घरातील चोरी, दरोडा, चोरी, दुखापत, नुकसान करून आगळीक करणे, धमकी देणे या सारखे ६ गंभीर गुन्हे, आरोपी शुभम ऊर्फ हग्णू ऊर्फ मास जनुजी चौधरी (२०) याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे घरफोडी, चोरी, गैरकायद्याची मंडळी, दुखापत, खुनाचा प्रयत्न, खून, अवैध शस्त्र बाळगणे या सारखे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदिया