शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

गोंदिया जिल्ह्यात कटंगी धरणानजीक शेकडो पोपट मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:37 PM

गोरेगाव तालुक्यात गुरूवारी (दि.१२) आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कटंगी धरणाजवळ शेकडो पोपटांचा मृत्यु झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे वन्यप्राण्यांना फटकागारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कदिलीप चव्हाणगोंदिया: गोरेगाव तालुक्यात गुरूवारी (दि.१२) आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कटंगी धरणाजवळ शेकडो पोपटांचा मृत्यु झाल्याची बाब उघडकीस आली आहे. शनिवारी (दि.१४) सकाळी वन विभागाचे कर्मचारी आणि निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी कटंगी धरणाजवळ पोहचून याची पाहणी केली. तसेच काही जखमी असलेल्या पोपटांना प्राथमिक उपचारासाठी वन विभागाच्या स्वाधीन केले.येथील कंटगी धरणाजवळ वनविभागाच्या सागवान नर्सरी परिसरात गुरूवार आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वादळी पाऊस आणि गारपीट झाली.याचा तडाखा नर्सरी परिसरात वास्तव्यास असलेल्या पोपटांना बसला.गारपिटीमुळे शेकडो पोपटांचा मृत्यु झाल्याने नर्सरी परिसरात मृत पोपटांचा अक्षरक्ष: सडा पडला होता. कटंगी धरणाजवळ वनविभागची पन्नास एकरात सागवान झाडांची नर्सरी आहे. या नर्सरीत दीड लाखांहून अधिक वेगवेगळ्या प्रजातीच्या पोपटांचे वास्तव्य होते असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गोरेगाव तालुक्यात १२ व १३ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा या परिसरात वास्तव्यास असलेल्या पोपटांना बसला. वादळी वारा व गारिपटीमुळे जवळपास दहा हजार पोपटांना जिव गमवावा लागला. पूर्वी या ठिकाणी लाखो पक्ष्यांची किलिबल ऐकू येत होती. गारपिटीमुळे ही किलबिलसुध्दा कमी झाली.शनिवारी (दि.१४) सकाळी आठ वाजता निसर्ग मंडळाच्या सदस्य व वनविभागाने आठ तास मृत्युमुखी पङलेल्या पोपटांना एका जागी एकत्र करून त्याची रितसर विल्हेवाट लावली. मृत्युमुखी पडलेल्या पोपटांमुळेही संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोपट मृत्युमुखी पडल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे वन्यजीव प्रेमीत हळहळ व्यक्त केली जात आहे. या वेळी निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, अमित रहांगडाले, गुड्डू कटरे, बाबा चौधरी व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.कुठे गेले दीड लाख पोपटकटंगी धरण परिसरातील नर्सरीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यात असलेल्या पोपटांना पाहण्यासाठी निसर्ग मित्राची गर्दी इथे पाहयला मिळायची.एकीकडे कटंगी जलाशय तर दुसरीकडे निसगार्चा अप्रतिम देखावा विविध प्रजातीचे पक्षी या जलाशयात अवतीभवती वावरतांना दिसत होते. त्यामुळे या परीसरात पर्यटकांची गर्दी पहायला मिळत होती.गारपीट व वादळी वाऱ्याचा मोठ्या प्रमाणात फटका पोपटांना बसला. गारपिटीमुळे शेकडो पोपट मृत्युमुखी पडले असून अनेक पक्षी जखमी झाले आहे. जखमी पोपट आणि पक्ष्यांवर प्राथमिक उपचार करुन जंगलात सोडण्यात येईल. मृत्युमुखी पडलेल्या पोपटांची विल्हेवाट लावण्यात येईल.- प्रवीण साठवने, वनपरिक्षेत्राधिकारी गोरेगाव.

टॅग्स :wildlifeवन्यजीव