लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नमो शेतकरी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळतात. त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आता महिन्याला केवळ पाचशे रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. अर्जाची पडताळणी करण्यात येत असून, ती आता अंतिम टप्प्यात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना जुलै २०२४ पासून दीड हजार रुपये दरमहा अर्थसाहाय्य दिले जाते. २,१०० रुपये देण्याची घोषणा अजूनही कागदावरच आहे. दीड हजाराचा लाभ मिळावा, यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले होते. अर्ज करणाऱ्यांना सरसकट लाभदेणे सुरू केले. मात्र, नंतर त्याला कात्री लावणे सुरू केले. आधी कर भरणारे व चारचाकी वाहन असणाऱ्यांचे अर्ज रद्द केले. योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले. आता शासकीय योजनेचा दुहेरी लाभ घेता येणार नाही, असे धोरण आखण्यात आले.
लाभ नको म्हणणारे किती?
- संजय गांधी निराधार योजना, कर भरणारे, चारचाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज करीत आहे. शासन स्तरावरूनही अपात्र केले जात आहे. कागदपत्रांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे.
- संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला स्वतःहून महिला व बालविकास विभागाकडे आम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ नको म्हणून अर्ज करीत आहेत. योजनेतून बाहेर पडत आहेत.
दुहेरी योजनेचा लाभ नाहीसंजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभमिळत असताना महिलांनी लाडक्या बहिणीसाठी अर्ज केले होते. आता दुहेरी योजनेचा लाभघेणाऱ्यांना वगळण्यात येणार आहे. यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला लाडक्या बहीण योजनेतून बाहेर पडत आहेत. तसा अर्ज त्यांच्याकडून केला जात आहे.
जिल्ह्यात एकूण अर्ज किती ?मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये मिळणार असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज केले. दोन लाख ८८ हजार ८२० अर्ज करण्यात आले. त्यात दोन लाख ६३ हजार २५८ अर्ज पात्र ठरले. तर २५ हजार ५६२ अर्ज अपात्र ठरले.
१२ हजाररुपये वर्षाला नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना दिले जातात. वर्षाला १८ हजार रुपये असा हिशेब असल्याने नमो योजनेतील महिलांना ५०० रुपये देण्यात येणार आहे.