शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

रंगमंचावरुन कुठलेही कार्यकम होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 5:00 AM

संपूर्ण देशभरातील आदिवासी गोंड समाजाचे उगमस्थळ व प्रमुख श्रद्धास्थान असलेले तालुक्यातील कचारगड देवस्थान माघ पौर्णिमेला आदिवासी बंधू भगिनींसाठी महत्वाचे असून येथे वर्षातून एकदा कोयापूनेमी (माघपौर्णिमा) निमित्त आवर्जून उपस्थित राहून आपल्या पूर्वजांना नमन व स्मरण करुन जातात. ही ५ दिवसीय यात्रा विविध आयोजनांनी रंगलेली असते.

ठळक मुद्देकचारगड यात्रा २५ पासून : पारंपरिक महापूजा करण्यासाठीच भाविक येणार

सालेकसा : कोरोना संकटामुळे यंदा कचारगड यात्रा होणार की नाही याबद्दल भाविकांमध्ये संशय असून अद्याप प्रशासनाने याबद्दल परवानगी दिली नाही. तरी सुद्धा आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे माघ पौर्णिमा निमित्त कोयापुनेमी महापूजा नक्की होणार आहे. परंतु यात्रादरम्यान येथे रंगमंचावरुन कसलेही सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमांसह सभासंमेलन व इतर गर्दी वाढविणारे कार्यक्रम होणार नाही, असा निर्णय कचारगड समितीने घेतला आहे.संपूर्ण देशभरातील आदिवासी गोंड समाजाचे उगमस्थळ व प्रमुख श्रद्धास्थान असलेले तालुक्यातील कचारगड देवस्थान माघ पौर्णिमेला आदिवासी बंधू भगिनींसाठी महत्वाचे असून येथे वर्षातून एकदा कोयापूनेमी (माघपौर्णिमा) निमित्त आवर्जून उपस्थित राहून आपल्या पूर्वजांना नमन व स्मरण करुन जातात. ही ५ दिवसीय यात्रा विविध आयोजनांनी रंगलेली असते. तसेच कचारगड हे देवस्थान नैसर्गिक स्थळी मोठ्या पर्वतरांगेत स्थापित असून येथे आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असून इतर छोट्यामोठ्या अनेक नैसर्गिक गुफांची शृंखला कायम आहे. वर्षानुवर्षे लोकांंना आकर्षित व आश्चर्यचकित करणाऱ्या या गुफा आहेत. त्यामुळे कचारगडला गैरआदिवासी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येतात. अशता या ५ दिवसात दरवर्षी मोठा जनसागर उसळत असतो.परंतु यंदा कोरोना संकट असून देशातील विविध राज्यातील भाविक येऊन गर्दी वाढवतील तर निश्चितच कोरोनाचे संक्रमण वाढू शकते. मोठ्या प्रमाणात कम्युनिटी स्प्रेड होऊन पूर्ण देशात कोरोना संक्रमण वाढविण्यास पोषक ठरु शकते. अशात गर्दी टाळणारे कार्यक्रम  होऊ न देणे यावर अधिक भर देण्यात येत आहे. त्यामुळे यंदा महासंमेलन, गोंडवाना महासभा, राजकारणी लोकांचे कार्यक्रम, धार्मिक प्रवचन व रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.पाच दिवस चालणार महापूजायंदा कोरोनामुळे गर्दी करणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले तरी यात्रेचे पाच दिवस कोयापुनेमी महापूजा केली जाणार आहे. गोंड राजे गोंडी धर्माचार्य आणि गोंडी भूमकाल यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन गोंडीध्वज फडकवून महापूजा व कचारगड यात्रेला सुरुवात केली जाईल. बाहेरुन कुणी आले नाही तर कचारगड देवस्थान समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. कचारगड यात्रेत येणारे भाविक आपल्या प्रथा परंपरेनुसार नैसर्गिक पूजा करतील आणि जातील. यात त्यांना कुठल्याही प्रकारची गर्दी करता येणार नाही. यासाठी इतर प्रांतातून आलेले भाविक गरज पडल्यास रात्री मुक्काम करु शकतील. यात्रेसाठी शासनाच्या परवानगीची वाट येत्या २५ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान चालणाऱ्या कचारगड यात्रेची परवानगी मिळावी म्हणून कचारगड देवस्थान समितीने प्रशासनाकडे अर्ज केला आहे. परंतु आतापर्यंत परवानगी मिळाली नसून आदिवासी भाविक काहीसे अस्वस्थ झाले आहेत. पारंपरिक देवपूजा खंडित होऊ नये म्हणून समितीतर्फे सतत प्रयत्न केले जात आहेत. परवानगी मिळाली तरी येणाऱ्या भाविकांना थांबविणे अशक्य आहे. माघ पौर्णिमानिमित्त भाविक येऊन आपली पारंपरिक नैसर्गिक पूजा करणारच. अशात प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अटींच्या आधारे परवानगी देणे योग्य ठरेल. गुरुवारी (दि.१८) तहसील कार्यालयात समितीला पाचारण करुन सभा घेण्यात येईल. यावेळी वरील बाबीवर चर्चा केली जाईल व परवानगीबाबत निर्णय घेतला जाईल. 

 

टॅग्स :Kacharagarh templeकचारगड देवस्थान