मुख्याध्यापकांच्या वेतन श्रेणीत निश्चित वाढ होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:00 AM2020-01-22T06:00:00+5:302020-01-22T06:00:16+5:30

आ. चंद्रिकापूरे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी युपीएससी, एमपीएसी परीक्षांसारखे उपक्रम शालेय स्तरापासूनच राबविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सामाजिक, आर्थिक, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी व्यक्तीमत्त्वाचे जिवन चरित्र नोंदविलेले संदर्भ ग्रंथ विद्यार्थ्यांना वाचनाकरीता देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

There will be a definite increase in the salary range of the Principal | मुख्याध्यापकांच्या वेतन श्रेणीत निश्चित वाढ होईल

मुख्याध्यापकांच्या वेतन श्रेणीत निश्चित वाढ होईल

Next
ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : मुख्याध्यापकांचे १९ वे शैक्षणिक संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : सहाव्या वेतन आयोगात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना वेतन श्रेणी देतांना ती केंद्राप्रमाणे न दिल्यामुळे त्यांच्या अधिनस्थ कार्यरत उच्च माध्यमिक शिक्षक जास्त वेतन वेतनश्रेणीचा लाभ घेतात. मुख्याध्यापकांवरील हा अन्याय जर शासनास दूर करायचा असेल तर मुख्याध्यापक या पदाला उच्च वर्गीकृत करने अनिवार्य आहे. त्याशिवाय हे शक्य नाही असे प्रतिपादन आ. मनोहरराव चंद्रिकापूरे यांनी केले.
जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांच्या १९ व्या शैक्षणिक समेलंनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघाचे अध्यक्ष प्राचार्य रमेश तणवानी होते. स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवा नेते रविकांत बोपचे होते. राज्य संघाचे अध्यक्ष मारोतराव खेडेकर, विदर्भ संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, विदर्भ संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी, उपाध्यक्ष विलास बारसागडे, शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश रूद्रकार, गोरेगांव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी टी.बी.भेंडारकर, विदर्भ संघाचे उपाध्यक्ष रामसागर धावडे, विदर्भ महिला प्रतिनिधी रजिया बेग, जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष दुर्गाप्रसाद पटले, विदर्भ प्रतिनिधी व माजी कार्यवाह महेंद्र मेश्राम, जिल्हा संघाचे मार्गदर्शक यशवंत परशुरामकर, जिल्हा संघाचे मार्गदर्शक प्रकाश पटेल, खुशाल कटरे, दिनेश रंहागडाले, नरेंद्र भरणे उपस्थित होते.
आ. चंद्रिकापूरे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी युपीएससी, एमपीएसी परीक्षांसारखे उपक्रम शालेय स्तरापासूनच राबविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सामाजिक, आर्थिक, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी व्यक्तीमत्त्वाचे जिवन चरित्र नोंदविलेले संदर्भ ग्रंथ विद्यार्थ्यांना वाचनाकरीता देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मारोतराव खेडेकर म्हणाले, मुख्याध्यापकांच्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्याध्यापक संघांच्या वतीने बक्षी समितीकडे समक्ष पाठपुरावा केला. परिणामी बक्षी समितीने शासनाच्या शिक्षण व अर्थ विभागाकडे पाठपुरावा करुन मुख्याध्यापकांना श्रेणी देतांना झालेला अन्याय लक्षात आणून दिला. वेतन श्रेणीतील त्रृटी दूर करण्यासाठी शिफारस केली.
महाराष्टÑ शासनाच्या अर्थमंत्रालयाच्या वतीने पाच सदस्यीय सचिव,उपसचिव यांची समिती गठीत केली. त्या समितीने मुख्याध्यापकांची वेतन श्रेणी संबंधातील मागणी रास्त असल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.
शासन ज्यावेळी सातव्या वेतन आयोगाचा खंड दोन लागू करेल त्यावेळी हा विषय चर्चेसाठी येईल असे सांगितले. प्रास्ताविक जिल्हा संघाचे कार्यवाह बी.डब्ल्यू.कटरे यांनी मांडले. संचालन जिल्हासंघाचे उपाध्यक्ष प्राचार्य सी.जी.पाऊलझगडे, जिल्हा संघाचे प्राचार्य के.एस.वैद्य यांनी केले तर आभार तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह आर.वाय.कटरे यांनी मानले.

संमेलनात ३० ठराव मंजूर
संमेलनाच्या प्रथम सत्रात, सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात, जिल्हा स्तरीय व शासन स्तरीय समस्या सोडविण्यासाठी एकूण ३० ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. पुढील वर्षीचे जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांचे २० वे शैक्षणिक संमेलन तिरोडा येथे होईल याची घोषणा या वेळी करण्यात आली.

Web Title: There will be a definite increase in the salary range of the Principal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.