कालव्यात पाणी पण पिकाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:00 AM2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:27+5:30

पाणी मिळणार नाही पीके मेली तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल असे शेतकऱ्यांना म्हणाले. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये पाटबंधारे विभागाविषयी तिव्र असंतोष पसरला आहे. अंजोरा येथील आऊटलेट क्र. २८७ व ३०४ या मधून पाणी न सोडल्याने दीडशे हेक्टर शेतातील धानपिक एका पाण्यासाठी संकटात आहे. पाणी द्या असा टाहो शेतकरी फोडत आहेत.

There is water in the canal but no for crop | कालव्यात पाणी पण पिकाला नाही

कालव्यात पाणी पण पिकाला नाही

googlenewsNext
ठळक मुद्दे१५० हेक्टरातील धानपीक संकटात : अभियंते म्हणतात पिके वाळल्यास लाभ मिळेल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा पावसाळा उशीरा सुरू झाल्याने धानाची रोवणी उशीरा झाली. जड धानाला आता एका पाण्याची गरज आहे. ज्या ठिकाणातून कालवा वाहून जात आहे. त्या ठिकाणचे धानपीक एका पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहे. कालवा भरून जात आहे, परंतु कालव्या खालच्या शेतीला पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अभियंता तयार नाहीत. त्यामुळे अंजारो परिसरातील १५० हेक्टरमधील धानपीक संकटात आहे.
बाघ पाटबंधारे विभागामार्फत तब्बल १५ दिवसापासून पुजारीटोला धरणातून येणाऱ्या कालव्याला पाणी सोडण्यात आले. हे पाणी आमगाव तालुक्याच्या अंजारो परिसरातील शेतीलाही हवे आहे. शेतकऱ्यांनी आऊटलेट सुरू करण्याची मागणी केली. परंतु आमगाव येथील शाखा अभियंता यांनी शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मागणीला फेटाळून लावले. १५ दिवसापासून कालवा वाहून जात असतांनाही अंजोरा येथील आऊटलेट (डिओ) न उघडल्यामुळे या परिसरातील १५० हेक्टरमधील धानपीक संकटात आहेत.शेतातून जाणारा कालवा पाण्याने भरून जात आहे. परंतु कालव्याच्या जवळील शेतातील जमिनीला भेगा पडल्या आहेत.कालवा निरीक्षक गभने व उपविभागीय अभियंता शुभम या दोघांना शेतकऱ्यांनी ५० वेळा फोन करून पाणी सोडण्याची विनंती केली. परंतु पाणी मिळणार नाही पीके मेली तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल असे शेतकऱ्यांना म्हणाले. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये पाटबंधारे विभागाविषयी तिव्र असंतोष पसरला आहे. अंजोरा येथील आऊटलेट क्र. २८७ व ३०४ या मधून पाणी न सोडल्याने दीडशे हेक्टर शेतातील धानपिक एका पाण्यासाठी संकटात आहे. पाणी द्या असा टाहो शेतकरी फोडत आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी माजी जि.प. सदस्य रमेश उर्फ छोटू बहेकार, सेवंता मोटघरे, जगदीश गायधने, रामेश्वर गायधने, राधेशाम गायधने, प्रकाश बहेकार, जगदिश बहेकार, हेमराज मोटघरे, बेनिराम चकोले, हेमराज चकोले, निर्मला गायधने, खेमराज मोटघरे, देवेंद्र अंबुले, मेघश्याम रहांगडाले, मोतीराम कावळे, विश्वनाथ उरकुडे, पांडुरंग फुंडे, मोहन फुंडे, नामदेव चुटे, शामचंद चकोले, विठ्ठल हुकरे व डोये या शेतकºयांनी केली आहे.

आऊटलेटमध्ये टाकले वीटा माती
अंजारोतील शेतकऱ्यांना पाणी न द्यायचा पवित्रा घेतलेल्या पाटबंधारे विभागाने काही दिवसांपूर्वी त्या आऊटलेटमध्ये वीटा आणि माती टाकल्याचे छोटू बहेकार यांनी सांगितले. पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांच्या पिकावर उठला आहे. आमच्या शेतातून गेलेल्या कालव्याचे पाणी आम्हाला मिळत नसून गोंदिया तालुक्याला देण्यात असल्याने पाटबंधारे विभागाच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश आहे.
अनेक ठिकाणी फुटतो कालवा
पुजारीटोला धरणातून सालेकसा, आमगाव तालुक्यातील गावांमधून जाणार कालवा गोंदियापर्यंत पाणी पुरवितो. परंतु या कालव्याची दुरूस्ती होत नसल्यामुळे अनेक ठिकाणातून हा कालवा फुटत आहे. कालव्याला अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे. ज्या ठिकाणी पाण्याची गरज नाही, त्या ठिकाणी बेवारस पाणी वाहून जात आहे. परंतु जिथे पाण्याची गरज आहे तिथे पाणी दिला जात नाही, ही शोकांतिका आहे.

Web Title: There is water in the canal but no for crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.