शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात फक्त तीनच ठिकाणी वीजरोधक यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:13 IST

प्रस्ताव टाकूनही फायदा नाही : प्रत्येक तालुक्यात हवे यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात वीज पडून दरवर्षी कित्येकांचा जीव जातो. अशात वीजरोधक यंत्र बसविणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, असे असतानाही जिल्ह्यात फक्त तीनच ठिकाणी वीजरोधक यंत्र बसविण्यात आल्याची माहिती आहे. तीन तालुक्यांत प्रत्येकी एका ठिकाणी हे यंत्र बसविण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात वीजरोधक यंत्र बसविण्यात यावे, असा प्रस्ताव टाकण्यात आला असतानाही अद्याप उर्वरित तालुक्यांत वीजरोधक यंत्र बसविण्यात आलेले नाही.

मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या कालखंडात विशेषतः माहे मे, जून व जुलै तसेच मान्सून पश्चात साधारणतः माहे ऑक्टोबर या महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावतो. मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेषकरून ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. जिल्ह्यातही वीज पडून दुर्घटना होत असतात. वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरू आहेतच. 

पावसाळ्याची सुरुवात ही नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असते. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत असल्याने ती अपरिहार्य आहे. कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊसही पडणार नाही. अशात वीजरोधक यंत्र बसविल्यास त्या परिसरात वीज पडण्याची घटना टाळून जीवितहानी टाळता येऊ शकते. 

यातूनच वीजरोधक यंत्र बसविणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यात सध्यातरी तीनच ठिकाणी वीजरोधक यंत्र बसविण्यात आले आहे. तीन तालुक्यांत प्रत्येकी एक असे हे यंत्र बसविण्यात आले असून उर्वरित तालुक्यांतही यंत्र बसविणे प्रस्तावित आहे.

वीजरोधक यंत्र म्हणजे काय?

  • वीजरोधक असलेल्या ठिकाणापासून २ किमीच्या आत वीज पडत नाही.
  • वीजरोधक यंत्र बसविल्याने त्या परिसरात विजेच्या घटना टाळल्या जातात.
  • वीज पडून प्राणहानी होऊ नये यासाठी वीजरोधक महत्त्वाची भूमिका बजावते.

जिल्ह्यात येथे वीजरोधक यंत्रआमगाव तालुक्यातील ग्राम अंजोरा येथे, गोंदिया तालुक्यातील ग्राम काटी येथे तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात असे एकूण तीन वीजरोधक यंत्र बसविण्यात आले आहे.  

टॅग्स :gondiya-acगोंदिया