शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
4
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
5
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
6
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
7
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
8
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
9
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
10
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
11
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
12
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
13
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
14
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
15
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
16
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
17
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
18
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
19
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
20
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया

शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आकडा पुन्हा वाढतोय; बोंडगावदेवीत हळहळजनक घटना

By अंकुश गुंडावार | Updated: June 3, 2025 19:27 IST

७६ हजारांचं कर्ज, आत्महत्येचा टोकाचा निर्णय : रामू बारस्कर शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. ३) सकाळी तालुक्यातील बोंडगावदेवी येथे घडली. रामू शंकर बारस्कर (५५, रा. बोंडगावदेवी) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील बोंडगावदेवी येथील रामू शंकर बारस्कर हे अल्पभूधारक शेतकरी असून, गावाजवळील सरांडी रिठी शेतशिवारात त्यांची दोन एकर कोरडवाहू शेती आहे. शेतात सिंचनाची सोय नसल्याने त्यांना पीक घेण्यास अडचण जात होती. पत्नी, मुलगी, मुलगा यांचा उदरनिर्वाह या शेतीवरच चालत होता. सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर, यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. मंगळवारी सकाळी त्यांनी घरी कुणीही नसताना घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक नरेश मारवाडे, पोलिस हवालदार कृष्णा मेंढे, बागडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला.

७६ हजारांचे बँक कर्जरामू बारस्कर यांच्यावर विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा बोंडगावदेवीचे ७६ हजार ३९४ रुपयांचे पीक कर्ज थकीत होते. तसेच आठ दिवसांपूर्वी शेतामध्ये सिंचनाची सोय व्हावी म्हणून बोअरवेल खोदला, पण पाणी लागले नाही. त्यात त्यांनी केलेला खर्च व्यर्थ गेला. यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली होती.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याgondiya-acगोंदियाCrop Loanपीक कर्ज