शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादातून मित्रांनीच केला मित्राचा खून; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 18:37 IST

मृताला आरोपींनी अनेकदा मद्याच्या धुंदीत मारहाण केली होती. त्यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीवरूनही वाद झाला होता.

ठळक मुद्देकुऱ्हाडीचे घाव घालून केले ठार १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

गोंदिया : पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादात तीन मित्रांनी एका मित्राचा कुऱ्हाडीने घाव घालून २७ मार्चच्या मध्यरात्री खून केला. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी २८ मार्चच्या रात्री दहा वाजता तीन आरोपींना अटक केली आहे.

रोहित ऊर्फ राहुल ऊर्फ अंडा डायमंड डोंगरे (वय १८, रा. कटंगीटोला) या मृताला आरोपींनी अनेकदा मद्याच्या धुंदीत मारहाण केली होती. त्यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीवरूनही वाद झाला होता. शहरातील अंगूर बगीचा परिसरातील टेंभरे किराणाजवळील मोकळ्या जागेत आरोपी योगेश ऊर्फ शेरू मारोती बोरकर (२६), विशाल हरिभाऊ बुढेकर (२६) व दुर्गेश लक्ष्मण विठोले (२५, तिन्ही रा. अंगुर बगीचा कटंगी) या तिघांनी त्याला मारले. आरोपींनी रोहित डोंगरेवर कुऱ्हाड व फरशीने हल्ला करून खून केला.

रोहितची आई कविता डायमंड डोंगरे (४५) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भादंविचे कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना २८ मार्चच्या रात्री १० वाजता अटक करण्यात आली. आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संजयकुमार सोने करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदियाPoliceपोलिस