शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पानटपरीवरील चर्चेतून प्रकार आला उघडकीस; मालकाने चालकाचा खून करून प्रेत पुरले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 16:27 IST

शहर पोलिसांनी सिनेस्टाइल केला खुनाचा उलगडा : दोघांना अटक, चार ते पाच आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मालकाकडून उसनवारीवर घेतलेले पैसे परत करीत नव्हता आणि कामावरही येत नव्हता. यातून मालक व ड्रायव्हर यात तणाव निर्माण झाला. यातूनच मालकाने इतरांच्या मदतीने आपल्या ड्रायव्हरचा खून करून त्याच्या खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला जंगलात पुरले. ही घटना बुधवारी (दि. २) उघडकीस आली. पानटपरीवर सुरू असलेल्या चर्चेवरून हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. शांतनू अरविंद पशिने (३६, रा. मोहगाव, गंगेरुवा, जि. शिवनी-मध्य प्रदेश), असे ठार मारण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

शहरातील गौतम नगर परिसरातील आरोपी विक्रम उर्फ विक्की पवन सिंग बैस (३६) याच्या घरी कार चालविण्यासाठी शांतनू अरविंद पशिने हा कामावर होता. त्याने मालकाकडून ८० हजार रुपये उसनवारीवर घेतले होते. ते पैसे परत करीत नव्हता आणि कामावरही येत नव्हता. त्यामुळे विक्रम व शांतनू यांच्यात वाद झाला. या वादातून शांतनू पशिने याला काठ्यांनी मारून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिस निरीक्षक किशोर पर्वते हे स्वतः फिर्यादी झाले व त्यांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), २३८, ३ (५) अन्वये गुन्हा नोंद केला. 

तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव गेडाम करीत आहेत. या गुन्ह्याची उकल पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात शहर ठाणेदार पर्वते, सहायक पोलिस निरीक्षक वैभव गेडाम, धीरज राजुरकर, पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखडे, अक्षय चन्नावार, घनश्याम थेर, अंमलदार कवलपालसिंह भाटीया, शेख, भेंडारकर, टेंभरे, बिसेन, चौहान, निशीकांत लॉदासे, सोनवाने, इंदुरकर, रावते, बारेवार, बिसेन, लांजेवार यांनी केली आहे. 

जंगलात मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा मानसगौतमनगर परिसरात ६ ते ७ लोकांनी मिळून एका व्यक्तीचा खून करून त्याचे प्रेत जंगलात जमिनीत पुरले आहे, अशी चर्चा ३० सप्टेंबर २०२४ रोजी गौत मनगर येथील पान टपरीवर सुरू होती. ही चर्चा पोलिसांच्या एका खबऱ्याने ऐकताच ती माहिती त्याने पोलिस उपनिरीक्षक थेर यांच्या मार्फत ठाणेदार पर्वते यांना दिली. यावर ठाणेदार पर्वते व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. गौतमन- गरच्या भागात झुडपी जंगल असल्याने व जंगली जनावर असल्याने प्रेत दफन केलेल्या जागेचा शोध घेणे शक्य होत नव्हते. यावर पर्वते यांनी २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री गौतमनगर परिसरातील दक्षिण दिशेला असलेल्या स्मशान भूमीमधील झुडपी जंगल पिंजून काढले. यामध्ये त्यांना मृतदेह ज्या ठिकाणी खड्यात पुरून ठेवला होता, त्याचा शोध घेऊन मृतदेह दंडाधिकारी यांच्या समक्ष सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून खड्याबाहेर काढला. मृतदेह झुडपी जंगलात पाच फूट खोल खड्डा खोदून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने जमिनीत पुरून ठेवला होता. 

घराला कुलूप लाऊन पसार झाल्याने संशय बळावला मृतदेह काडल्यानंतर तो विक्रम बैस याचा ड्रायव्हर शांतनू पशिने याचा असल्याचे नागरिकांनी ओळखले. त्यानंतर पोलिसांनी विक्रम बैंस याच्याकडे चौकशी केली असता, तो सुरुवातीला पोलिसांना मिळाला. नंतर आपल्या परिवारासोबत घराला कुलूप लावून फरार झाला. यातून पोलिसांचा संशय बळावला. खुनासंबंधी संशयावरून विक्रम बैस याचा मित्र विकास ओमप्रकाश गजभिये याला पकडले असता, त्याने शांतनू पशिने याच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सांगून त्या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारी