शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही अपघाताला चालकच जबाबदार ! अपघातात ११ जणांचे गेले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:37 IST

चौकशी पूर्ण : अहवाल परिवहन आयुक्तांकडे

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी डव्वा जवळ शिवशाही बसचा भीषण अपघात होऊन ११ जण ठार झाले होते. या अपघाताची चौकशी करण्यासाठी नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली होती. या चौकशी समितीने दहा दिवस सखोल चौकशी करून आपला अंतिम चौकशी अहवाल परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात अपघातास चालकच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

खजरी डव्वा जवळ शिवशाही बसच्या भीषण अपघातानंतर महामंडळावर चौफेर टीका झाली. तसेच शिवशाही बसेसच्या फिटनेसवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. तर प्रवाशांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने सुद्धा या अपघाताची गांभीर्याने दखल घेतली. शिवशाही बसच्या अपघातातील नेमकी कारणे काय आहेत, अपघातास नेमके कारणीभूत कोण, शिवशाही बसचे फिटनेस आदी सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी दोन चौकशी समिती गठित केल्या होत्या. जिल्हास्तरावर गोंदियाचे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम तिवसकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. तर विभागीय स्तरावर नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती होती. 

गोंदिया येथील समितीने दोन दिवसांपूर्वीच आपला अहवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्याकडे सादर केला. यानंतर चव्हाण यांनी दोन्ही चौकशी अहवाल एकत्रित करून त्याचा एकत्रित अहवाल परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडे सादर केला आहे. 

या चौकशी अहवालात खजरी शिवशाही अपघातास चालकच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच अपघातग्रस्त शिवशाही चालकाकडून यापूर्वी सुद्धा अपघात झाले असताना त्याला सेवेत कार्यरत कसे ठेवण्यात आले यावर सुद्धअ ताशेरे ओढण्यात आले आहे. त्यामुळे या चौकशी अहवालावरून चालकासह एसटी महामंडळाचे काही जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई निश्चित मानली जात आहे. 

मुंबई येथील संस्था चौकशीसाठी दाखल शिवशाही बस अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी व अपघा- तातील कुठली बाजू सुटू नये यासाठी थर्ड पार्टी चौकशी केली जात आहे. यासाठी मुंबई येथील एका स्वयंसेवी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती सोमवारी नागपूर येथे दाखल झाली. या समितीने खजरी येथील घटनास्थळाला भेट देऊन अपघातामागील कारणे जाणून घेतल्याची माहिती आहे. ही समिती देखील परिवहन आयुक्तांकडे अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे.

परिवहन आयुक्तांच्या आदेशाकडे लक्ष खजरी शिवशाही बस अपघात प्रकरणाचा चौकशी अहवाल परिवहन आयुक्तांकडे सादर केल्यानंतर आता याप्रकरणी ते याप्रकरणी नेमकी कुणा- कुणावर कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Accidentअपघातgondiya-acगोंदिया