शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धानाला बोनसचा निर्णय जाहीर पण आता खात्यावर केव्हा होणार जमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 18:13 IST

शेतकऱ्यांचा सवाल : दीड लाख शेतकऱ्यांच्या लागल्या नजरा

विजेंद्र मेश्राम लोकमत न्यूज नेटवर्कखातिया : राज्यातील महायुती सरकारने गेल्या वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान धानाला प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली. याचा जीआर सुद्धा पंधरा दिवसांपूर्वी निघाला. शासनाने लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम जमा केली जाईल असे सांगितले होते. पण अद्यापही ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे बोनसची रक्कम बँक खात्यावर जमा केव्हा होणार, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

शासन धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान म्हणून बोनस जाहीर करते. पूर्वी बोनस हा प्रति क्विंटल मागे दिला जात होता. पण गेल्या तीन वर्षापासून शासनाने यात बदल करीत हेक्टरी बोनस देण्यास प्रारंभकेला. गेल्या वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धानाला हेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली तेच शेतकरी बोनससाठी पात्र ठरतील असा निकष शासनाने यासाठी लावला होता. 

जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केली होती. ते शेतकरी बोनससाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील बोनससाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी २५० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. बोनसचे आदेश निघून पंधरा ते वीस दिवस लोटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा झाली नसल्याने ही रक्कम बँक खात्यावर केव्हा जमा करणार? असा सवाल जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. 

आधी आदेशासाठी तर आता पैसे जमा होण्यासाठी प्रतीक्षामहायुती सरकारने धानाला बोनसची घोषणा चार महिन्यांपूर्वी केली. पण त्यासंदर्भातील आदेश निघण्यासाठी चार महिने लागल्याने शेतकऱ्यांना त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. तर आता आदेश निघाले; पण बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा न झाल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

"बोनसच्या रकमेतून शेतकरी उधारउसनवारी व खरीप हंगामाचे नियोजन करीत असतात. त्यामुळे शासनाने बोनसची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करून दिलासा द्यावा."- डॉ. जगदीश पारधी, शेतकरी चिरामनटोला

"शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी उधार उसनवारी व कर्ज काढावे लागले. त्यामुळे बोनसची रक्कम लवकर मिळाल्यास शेतकऱ्यांना खरिपाची तयारी व उधार उसनवारी फेडण्यास मदत होईल."- विजय रहांगडाले, सेवा सोसायटी अध्यक्ष अर्जुनी

"महायुती सरकारने बोनसची घोषणा केली; पण त्याचे आदेश काढण्यासाठी चार महिने लावले. आता बोनसची रक्कम जमा करण्यासाठी चार महिने लावू नये, लवकर रक्कम जमा करावी."- देवानंद महारवाडे, शेतकरी खातिया

टॅग्स :PaddyभातCropपीकgondiya-acगोंदिया