शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

संकेतस्थळावर मोबाइलची किंमत कमी दाखविणे कंपनीला भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 17:47 IST

ग्राहकाला द्यावा लागला मोबाइल अन नुकसान भरपाई : ग्राहक आयोगाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मोबाइल कंपनीने चुकीने ऑनलाइन सॅमसंग गॅलेक्सी ए २२ अल्ट्रा ५ जी या मोबाइलची किंमत कंपनीच्या संकेतस्थळावर १६,५५८ रुपये दाखविली. दरम्यान गोंदिया शहरातील पाच व्यक्तींनी ते बुक केले. तसेच त्याचे पैसेसुद्धा कंपनीच्या अकाऊंटवर पाठविले. मात्र या मोबाइलची मूळ किमत १ लाख ३१ हजार ९९९ रुपये होती. पण कंपनीकडून चुकीने ऑनलाइन किमत कमी दाखविण्यात आली. त्यामुळे कंपनीने ऑनलाइन दाखविलेल्या किमतीत मोबाइल देण्यास संबंधित ग्राहकांना नकार दिला. त्यामुळे ग्राहकांनी याविरोधात ग्राहक मंचात धाव घेतली. ग्राहक मंचाने कंपनीला ऑनलाइन दाखविलेल्या किमतीत मोबाइल आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्यामुळे कंपनीला एक चूक १ लाख ४१ हजार रुपयात पडली.

३१ मार्च २०२२ रोजी, एका ई- कॉमर्स कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर १ लाख १५ हजार ४४१ मूळ किमत असलेल्या मोबाइलवर ८७ टक्के सूट देत तो केवळ १६,५५८ रुपये किमतीला विक्रीला ठेवला. कंपनीच्या संकेतस्थळावर ही ऑफर पाहून गोंदिया येथील स्वाती संजय जैन, जितेंद्र गुमाचंद जैन, दिलीप मंगलचंद जैन, पीयूष दिलीप जैन व पायल खुशाल जैन यांनी त्वरित त्या मोबाइलसाठी ऑनलाइन ऑर्डर बुक केली आणि १६,५५८ रुपये प्रत्येकाने त्यांच्या डेबिट कार्डद्वारे पाठविले. त्यानंतर २ एप्रिल २०२२ रोजी, सर्व तक्रारदारांना या कंपनीकडून एक मेल प्राप्त झाला. काही तांत्रिक चुकीमुळे संकेतस्थळावर मोबाइलची किमत कमी दाखविण्यात आली.

त्यामुळे त्या किमतीत मोबाइल देणे शक्य नसल्याचे सांगत या पाचही ग्राहकांचे पैसे परत केले. मात्र या पाचही ग्राहकांनी ही आपली फसवणूक असल्याचे सांगत संकेतस्थळावर दाखविलेल्या किमतीत मोबाइल देण्याची विनंती मेलद्वारे कंपनीला केली. परंतु कंपनीने नकार दिल्याने तक्रारदारांनी अॅड. सागर जे. चव्हाण यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक आयोग गोंदिया येथे कंपनी विरोधात याचिका दाखल केली.

ग्राहकाच्या बाजूने दिला निर्णयअॅड. सागर चव्हाण यांनी न्यायालयात युक्तिवाद करून कंपनीने तक्रारदारां- सोबत मोबाइल विक्रीचा करार केला व तक्रारकर्त्याच्या संमतीशिवाय कराराचे उल्लंघन केले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत अनुचित व्यापार व्यवहा- रसुद्धा असल्याचा युक्तिवादसुद्धा अॅड. चव्हाण यांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेत ३ जुलै रोजी ग्राहक आयोगाचे अध्यक्ष नितीनकुमार स्वामी, सदस्य अतुल आळसी आणि संजय जोशी यांच्या पीठाने ग्राहकांची बाजू योग्य असल्याचे सांगत पाच ग्राहकांना संकेतस्थळावर दाखविलेल्या किमतीत मोबाइल ४५ दिवसांच्या आत देण्याचे व तक्रारदाराला झालेल्या त्रासासाठी नुकसान भरपाई ७ हजार रुपये व तक्रार दाखल करण्यासाठी आलेला खर्च ३ हजार रुपये देण्याचे आदेश कंपनीला दिले.  

टॅग्स :consumerग्राहकgondiya-acगोंदिया