शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी गर्भवतींची ‘माहेर’कडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 20:45 IST

आदिवासी क्षेत्रातील गर्भवती व प्रसूती होणाऱ्या महिलांना प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर विश्राम करण्यासाठी ‘माहेरघर’ योजना सुरू करण्यात आली. परंतु आदिवासी महिलांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ‘माहेरघरां’कडे आदिवासी भागातील गर्भवतींनी पाठ केली आहे.

ठळक मुद्देअनेक माहेरघर कुलूपबंद : दरेकसा येथे वर्षभरात एकही गर्भवती गेली नाही

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी क्षेत्रातील गर्भवती व प्रसूती होणाऱ्या महिलांना प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर विश्राम करण्यासाठी ‘माहेरघर’ योजना सुरू करण्यात आली. परंतु आदिवासी महिलांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ‘माहेरघरां’कडे आदिवासी भागातील गर्भवतींनी पाठ केली आहे. जिल्ह्यातील दरेकसा येथील माहेरघरात वर्षभरात एकही गर्भवती राहिली नाही.बहुतांश आदिवासी लोक डोंगराळ भागात वास्तव्य करतात. जिल्ह्यात आदिवासींच्या बहुतांश गावात पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे गर्भवती महिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी सोय नाही. दुरध्वनी सेवा खंडीत व मोबाईलचीही समस्या होते. यामुळे योग्य उपचाराअभावी आदिवासी गावांत बाल व माता मृत्यूचे प्रमाण अधिक असते. या स्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक आदिवासी गावात महिलांसाठी सन २०१०-११ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘माहेरघर’ योजना सुरू करण्यात आली. यांतर्गत जिल्ह्यातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘माहेरघर’ तयार करण्यात आले.सुरक्षित व आरोग्य संस्थेत प्रसूती करण्यासाठी गर्भवती महिला व तिच्या बालकाला राहण्याची सोय करून देण्यासाठी ‘माहेरघर’ ही योजना अंमलात आणण्यात आली. सुरक्षीत व वैद्यकीय संस्थेतच सुरक्षीत बाळंतपण व्हावे यासाठी गर्भवती व प्रसूती झाल्यानंतर माता व बाळाला निवासाची सोय म्हणून ‘माहेरघर’ बांधण्यात आले. परंतु या ‘माहेरघरां’कडे आदिवासी भागातील गर्भवती महिलांनी पाठ फिरविली आहे.गर्भवतींना प्रसूतीच्या दोन दिवसाआधीच त्या ‘माहेरघरा’त दाखल करून डॉक्टरांकडून नियमित तपासणी करण्यात येते. गर्भवतींना संदर्भ सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग बाध्य असल्यामुळे त्या ‘माहेरघरा’चा लाभ गर्भवती महिलांना घेता येऊ शकते. परंतु त्या ‘माहेरघरां’ना आजघडीला कुलूप लागल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.केशोरीत सर्वाधिक ७९ गर्भवतींनी घेतला लाभजिल्ह्यात देवरी तालुक्यातील मुल्ला, घोनाडी, ककोडी, अर्जुनी-मोरगावच्या केशोरी, गोठणगाव, कोरंभीटोला, महागाव, चान्ना बाक्टी, सडक अर्जुनीच्या शेंडा, पांढरी, सालेकसाच्या कावराबांध, दरेकसा व बिजेपार असे १३ ‘माहेरघर’ आहेत. मुल्ला येथील माहेरघरात १७ गर्भवतींनी लाभ घ्यायला पाहिजा होता. परंतु फक्त ९ गर्भवतींनी लाभ घेतला आहे. घोनाडी येथे ५१ पैकी ३२, ककोडी ३६ पैकी १६, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात केशोरी येथे १३१ पैकी ७९, गोठणगाव २४ पैकी २२, कोरंभीटोला ४६ पैकी २७, महागाव ५५ पैकी १६, चान्ना-बाक्टी २५ पैकी २६ ने लाभ घेतला आहे. उद्दीष्टापेक्षा एक लाभार्थी जास्त झाला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात शेंडा येथे ३० पैकी २५, पांढरी ४१ पैकी १०, सालेकसा तालुक्यात कावराबांध २६ पैकी ३, दरेकसा येथे एकानेही लाभ घेतला नाही. बिजेपार येथे २९ पैकी फक्त ५ महिलांनी माहेरघराचा लाभ घेतला.माहेरघरासाठी तीन लाख खर्चजिल्ह्यातील आदिवासी भागात उभारण्यात आलेल्या माहेरघराचा लाभ घेणाºया गर्भवतींना बुडीत मजूरी मिळावी म्हणून २०० रूपये दराने प्रत्येक दिवसाची बुडीत मजूरी दिली जाते. त्यांच्या जेवणाची सोय बचत गटाच्या माध्यमातून केली जाते. त्यासाठी बचत गटाला प्रत्येक लाभार्थ्याच्या मागे २०० रूपये दिले जातात. गर्भवतींना सर्व सोयी सुविधा असलेले स्वतंत्र कक्ष देण्यात येते. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात २७० गर्भवतींनी या माहेरघराचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्यावर ३ लाख १ हजार २०० रूपये आरोग्य विभागाने खर्च झाले आहे.जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी भागात पक्के रस्ते नाहीत. अशा स्थितीत गर्भवतींचा जोखमेपासून बचाव करण्यासाठी व सुरक्षीत प्रसूतीसाठी ‘माहेरघर’ योजना उत्तम आहे. बाल व माता मृत्यू थांबविण्यासाठी ही योजना आहे. गर्भवती बरोबर एका नातेवाईकाचीही सोय या ठिकाणी केली जाते. आदिवासी महिलांनी याचा लाभ घ्यावा.-डॉ. श्याम निमगडेजिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गोंदिया

टॅग्स :Healthआरोग्य