शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रोजच्या वादावर भयंकर उपाय! सुनेचा कुऱ्हाडीने खून तर वहिणीचे कान छाटले

By नरेश रहिले | Updated: September 24, 2023 17:52 IST

गोंदिया तालुक्याच्या देवरी (धापेवाडा) येथील आरोपी प्रितमलाल सहेसराम ठाकरे (५५) हा शुल्लक कारणावरून भावाघरच्या मंडळींसोबत वाद करायचा.

गोंदिया : घराशेजारी घर असल्याने अधून-मधून खाक्या उडायच्या. क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून होणाऱ्या वादावर कायमस्वरूपी विराम आणायचा म्हणून पुतन सुनेवर कुर्हाडीने घाव घालून खून केला. तर वहिणीचे कुऱ्हाडीने कान छाटल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता गोंदिया तालुक्याच्या देवरी धापेवाडा येथे घडली. सुनिता दिनेश ठाकरे (३५) रा. देवरी असे मृत महिलेचे नाव आहे. तर रिमनबाई प्रेमलाल ठाकरे (६०) रा. देवरी असे गंभीर जखमी असलेल्या वहीणीचे नाव आहे.

गोंदिया तालुक्याच्या देवरी (धापेवाडा) येथील आरोपी प्रितमलाल सहेसराम ठाकरे (५५) हा शुल्लक कारणावरून भावाघरच्या मंडळींसोबत वाद करायचा. या वादात तो ठार मारीन अन् जेल भोगून येईल असे नेहमी म्हणायचा. २४ सप्टेंबर रोजी मृतक सुनिता ठाकरे व तिची सासू रिमनबाई ठाकरे ह्या दोघ्याही घरीच होत्या. तिचे पती झिटाबोडी येथे गेले होते. तर सासरे हे शेतात गवत आणायला गेले होते. घरी असलेल्या सासू- सुनेसोबत आरोपी प्रितमलाल ठाकरे (५५) याने वाद सुरू केला. तणस आणि गवतावरून उत्पन्न झालेला वाद खुनावर येऊन थांबला. गवतावरून झालेल्या वादात आरोपी प्रितमलाल याने कुऱ्हाड आणून सुनिताच्या गळ्यावर, डोक्यावर सपासप वार केला. यात रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या सुनिताचा क्षणार्धात मृत्यू झाला. तो इतक्यातच थांबला नाही. त्याने आपल्या हातातील कुऱ्हाड रिमनबाई यांच्यावर उगारली. यात त्यांचा एक कान छाटल्या गेला. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मृत पावलेल्या सुनिता ठाकरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला.

तेरवीला जाण्याचे नियोजन असतांना घरातच झाला खूनगोंदिया तालुक्याच्या गिरोला येथे एका नातेवाईकांच्या घरी तेरवीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला जाण्याची तयारी प्रेमलाल ठाकरे व रिमन ठाकरे यांची होती. जनावरांसाठी गवत आणतो त्यानंतर तेरवीला जाऊ असे प्रेमलाल यांनी पत्नी रिमन यांना सांगून ते शेतात गवत आणायला गेले होते. परंतु शेतातून घरी परतताच प्रेमलाल यांना सुनेचा मृतदेह रक्ताच्या थारोड्यात पडलेला दिसला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी अवस्थेत तडफडत होती.

अन् सायकलने आरोपी पळत सुटलासुनिताला कुऱ्हाडीने मारून तिचा खून करणारा आरोपी प्रितमलाल ठाकरे हा या घटनेनंतर आपली सायकल घेऊन जोराजोराने वाहन चालवितांना जात असतांना झिटाबोडी वरून परत येणारे मृतकचे पती दिनेश ठाकरे यांना तो दिसला. परंतु त्यांना या घटनेची किंचीतही कल्पना नसल्याने त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आपले घर गाठले. घरी आल्यावर त्यांना या घटनेची माहिती झाली.

सहा महिन्यापूर्वी दिली होती ठार करण्याची धमकीपाच-सहा महिन्यापूर्वी आरोपी व मृतक यांचा वाद झाला होता. या वादात आरोपीने ठार केल्याशिवाये राहणार नाही. तुम्हाला ठार करीन अन् जेल भोगून येईन असे तो म्हणायचा. त्याने घरी पुरूष मंडळी नसल्याची संधी साधत त्यांचा खून केला.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू