शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दहा दिवसात ५२ कोरोना बाधित कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:00 AM

मुंबई, पुणे इतर मोठ्या शहरात रोजगारासाठी गेलेले मजूर आपल्या स्वगृही परतले. मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात ४४ हजार नागरिक दाखल झाले. तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रेड झोन क्षेत्रातून आलेल्यांमुळे १९ मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. पहिल्याच दिवशी दोन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्देशुक्रवारी पुन्हा दोन जण कोरोनामुक्त : जिल्ह्यात आता १७ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात तब्बल आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत ६९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुध्दा चांगले असल्याने जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. शुक्रवारी (दि.५) पुन्हा दोन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने दहा दिवसांच्या कालावधी एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची सख्या ५२ वर पोहचली असून जिल्ह्यात आता एकूण १७ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा देणारी ही बाब आहे.केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर बाहेरील राज्य आणि जिल्ह्यात अडकलेले नागरिक त्यांच्या स्वगृही परतले. यामध्ये सर्वाधिक मजुरांचा समावेश आहे. मुंबई, पुणे इतर मोठ्या शहरात रोजगारासाठी गेलेले मजूर आपल्या स्वगृही परतले. मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात ४४ हजार नागरिक दाखल झाले. तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रेड झोन क्षेत्रातून आलेल्यांमुळे १९ मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. पहिल्याच दिवशी दोन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत गेल्याने आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ६९ रुग्णांची नोंद झाली.कोरोना बाधित आढळलेले रुग्ण हे प्रामुख्याने ग्रामीण भागातील अधिक होते. शिवाय या सर्वांना मुंबई, पुणे, दिल्ली येथील प्रवासाची हिस्ट्री होती. बाहेरील जिल्हा अथवा राज्यातून आपल्या स्वगृही परतल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभाग आणि प्रशासनाला देत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढला होता. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागात सुध्दा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व कोरोना बाधित रुग्णांवर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते.कोरोना बाधित हे उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याने आणि त्यांची रोगप्रतिकार क्षमता देखील चांगली असल्याने ते लवकर बरे होत आहे. यामुळेच मागील दहा दिवसांच्या कालावधी जिल्ह्यातील एकूण ५२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे निश्चितच ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहता आठवडाभरात गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.सीमेवरच तपासणीची मदतबाहेरुन येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता प्रशासनाने यापासून धडा घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व जिल्हा आणि राज्य मार्गावर सीमा तपासणी नाके उभारुन त्या ठिकाणी बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत होत आहे.अशी आहे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याजिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात २८ मे रोजी २, २९ मे रोजी २५, ३० मे ४, ३१ मे ६, १ जून रोजी ६,२ जून रोजी ४, आणि ३ जून रोजी २, ५ जून रोजी २ असे एकूण ५२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या