Tejaswini Patel is the second in the State Examination in Steno | स्टेनो परीक्षेत तेजस्विनी पटले राज्यात द्वितीय
स्टेनो परीक्षेत तेजस्विनी पटले राज्यात द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथील वर्ष २०१८ मध्ये प्रवेशित स्टेनो (इंग्लीश) प्रशिक्षणार्थी तेजस्वीनी पटले हिने अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकाविला.१५ जुुलै २०१९ कौशल्य दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्यातर्फे संस्थेतील प्राचार्य डोंगरे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. तेजस्विनीने आपल्या यशाचे व्यवसाय निर्देशक राऊत आणि आई-वडिलांना दिले आहे.


Web Title: Tejaswini Patel is the second in the State Examination in Steno
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.