लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या १५ जुलैच्या पत्रानुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा चौथा टप्पा ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निणर्याचे शिक्षक संघटनांनी सुध्दा स्वागत केले. मात्र शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या या ऑफलाइन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला असून याला शिक्षक सहकार संघटनेने विरोध दर्शविला आहे. तसेच या बदल्या सुध्दा ऑनलाइन पध्दतीने करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या ऑफलाइन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने सर्व जि.प. मुख्यकार्यकारीअधिकारी यांना दिले आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे जिल्हातंर्गत बदल्यांना सुध्दा तोच निकष लावून ऑनलाइन बदल्या करण्यात याव्या. कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. मात्र बदल्यांसाठी आॅफलाइनचा निकष लावला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील दोन वर्षांचा ऑनलाइन बदल्यांचा अनुभव पाहता ९५ टक्के शिक्षक यामुळे समाधानी होते. शिवाय यात भ्रष्टचाराला वाव नसल्याने कुणावर अन्याय झाला नाही. शासनाने कोरोनाचे कारण पुढे करीत ऑफलाइन बदल्या करित असल्याचे म्हटले आहे. मात्र आॅफलाइन बदली प्रक्रियेमुळे शिक्षकांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही ठिकाणी कडक लॉकडाऊन असल्याने शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करायला जाणे सुध्दा शक्य होणार नाही. ऑनलाइन बदल्या केल्यास या सर्व अडचणी दूर होतील. १५ जुलै २०२० च्या पत्रानुसार नव्याने बिंदू नामावली मंजूर करुन आंतरजिल्हा बदल्या करण्याचे आदेश दिले आहे. मात्र तसे न करता जुनीच बिंदू नामावली गृहीत धरण्यात यावी. बदल्या करताना ३० सप्टेंबरपर्यंत रिक्त असलेल्या पदांचा विचार करुन आंतरजिल्हा बदल्या करण्यात याव्या. आंतरजिल्हा बदली करण्यापूर्वी शिक्षकांना अर्जात दुरूस्तीसाठी संधी देण्यात यावी.मागील तीन टप्प्यात आंतरजिल्हा बदली होवूनही अद्यापही कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात विभागीय अध्यक्ष रवी अंबुले, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम, कार्याध्यक्ष प्रमोद शहारे, नंदकिशोर उईके, लाखेश्वर लंजे यांचा समावेश होता.
शिक्षण ऑनलाईन बदल्या मात्र ऑफलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या ऑफलाइन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने सर्व जि.प. मुख्यकार्यकारीअधिकारी यांना दिले आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण ऑनलाईन बदल्या मात्र ऑफलाईन
ठळक मुद्देशिक्षक संघटनेचा विरोध । जिल्हातंर्गत बदल्या, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन