लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेशंन योजना रद्द करुन नवीन अशंदान पेशन योजना लागू केली. मात्र ही योजना कर्मचारी विरोधी असल्याने ती रद्द करुन जुनीच पेशंन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. मात्र शासनाने त्याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे शिक्षकांनी गुरूवारी शिक्षक दिनी काळ्या फिती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.शासनाचा धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी राज्य शासकीय कर्मचारी व निम शासकीय कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्धार केला.९ सप्टेंबरला एक दिवसाचा लाक्षणिक संप आणि शासनाने यानंतरही दखल न घेतल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. याच आंदोलनाची सुरूवात शिक्षक दिनापासून करण्यात आली.सडक अर्जुनी तालुक्यात शेंडा चौक येथे शिक्षक संघटनानी एकत्र येऊन आणि काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदविला.या वेळी राज्य कार्यकारणी सदस्य किशोर डोंगरवार, शिक्षक समितीचे अध्यक्ष पी.एन.बडोले, सरचिटणीस बाळू वालोदे, सचिव हुमेंद्र लांजेवार, महेश भिवगडे, हेमंद वैद्य, बी.के.चांदेकर, अरुण वैद्य, अरविंद कापगते, बी.एस.बोकडे, जे.बी.करडे, हेमंत वैद्य, सुरेश आमले, घनश्याम मेश्राम,नरेश मेश्राम, महेश कवरे, पी. टी. नेवारे, एकनाथ लंजे, राजू कोटांगले, राहुल कोनतंवार, भुमेश वदोले, एन.ए.बडोले, एम.बी.ब्राम्हणकार, डी.एस.राऊत, डी.पी.येरणे, पी.एस.उके उपस्थित होते.
शिक्षक दिनी शिक्षकांनी काळ्या फिती लावून केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST