शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

अनुदानासाठी शिक्षकांची दोन जिल्ह्यात पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:01 IST

संघटनेचे अध्यक्ष प्रा. मोतीदास उके, उपाध्यक्ष सुनील डोंगरे, कार्याध्यक्ष मनिष शहारे, सहसचिव प्रा.डि.सी.कटरे, सहकोषाध्यक्ष रविंद्र जगने यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेली दिंडी रविवारी (दि.९) दुपारी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्या घरी पोहचली. दरम्यान, पटोले यांनी, यांनी विनाअनुदानित प्राध्यापकांच्या समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देअनुदानासाठी आगळे-वेगळे आंदोलन : विधानसभा अध्यक्षांच्या घरावर धडकले

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : अनुदान मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटनेच्यावतीने शनिवारी (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयातून पायी दिंडी काढण्यात आली. दिंडी थेट विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुकडी (भंडारा) येथील निवासस्थानी धडकली.यावर पटोले यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.संघटनेचे अध्यक्ष प्रा. मोतीदास उके, उपाध्यक्ष सुनील डोंगरे, कार्याध्यक्ष मनिष शहारे, सहसचिव प्रा.डि.सी.कटरे, सहकोषाध्यक्ष रविंद्र जगने यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेली दिंडी रविवारी (दि.९) दुपारी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्या घरी पोहचली. दरम्यान, पटोले यांनी, यांनी विनाअनुदानित प्राध्यापकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र १४६+१६३८ कनिष्ठ महाविद्यालयांना २४ फेब्रुवारी २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १०७ कोटींचा निधी मंजूर झालेल्या अनुदान निधी वितरणाचा शासन निर्णय काढून शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्याचे व अघोषित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानासह घोषित करण्याबाबतच्या निवेदनावर कार्यवाही करण्यात यावी असे स्वत:च्या सहीचे पत्र उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांना पाठविले. तसेच बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. या पायी दिंडी आंदोलनात एच. टी. क. महाविद्यालयाचे प्राचार्य एस. डब्ल्यू.कुरेशी, संघटनेचे सचिव प्रा. हेतराम चुटे, सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष मनोज मस्के, प्रा. भाष्कर लांजेवार, प्रा. रवि कटरे, प्रा. प्रविण मेंढे, प्रा. मधू दिहारी, प्रा. एम. एल.पटले, प्रा.एस.बी.रंगारी, अर्जुनी-मोरगाव तालुका प्रमुख प्रा. एम. जे. रामटेके, प्रा.आर.झेड.गौतम, प्रा. आरती कठाणे, प्रा. गजभिये, प्रा. उके तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

टॅग्स :Socialसामाजिक