शिक्षक समितीने केला बीडीओ पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 09:43 PM2018-03-22T21:43:12+5:302018-03-22T21:43:12+5:30

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका आमगावच्या वतीने पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेले खंड विकास अधिकारी अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Teachers committee felicitates BDO Patil | शिक्षक समितीने केला बीडीओ पाटील यांचा सत्कार

शिक्षक समितीने केला बीडीओ पाटील यांचा सत्कार

Next

ऑनलाईन लोकमत
आमगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका आमगावच्या वतीने पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेले खंड विकास अधिकारी अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष डी.व्ही. बहेकार होते. या वेळी शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, संचालक एन.बी. बिसेन, संचालिका दीक्षा फुलझेले, के.टी. कारंजेकर, एस.टी. भालेकर, ए.टी. टेंभुर्णीकर, हिवश्याम पाऊलझगडे, एस.एम. उपलपवार, इ.एफ. देशमुख, एस.एम. येडे, वाय.आय. रहांगडाले, डी.बी. भगत, आर.आय. हुमे, आर.इ. खापर्डे, तालुका नेते एस.बी. पाऊलझगडे, सरचिटणीस संदीप मेश्राम, कार्याध्यक्ष बी.एस. केसाळे, कोषाध्यक्ष शोभेलाल ठाकूर, विनोद रंगारी, तालुका संपर्क प्रमुख सुरेश मेेंढे, सुरेश कटरे, कार्यालयीन सचिन एन.जी. कांबळे, एच.बी. भारद्वाज, बी.आर. शिरसाट, एम.बी. चव्हाण, अंजन कावळे, जैपाल ठाकूर, दिनेश डोंगरे, गणेश लोहाडे, अश्विन भालाधरे, सतीश बिट्टे, विठ्ठल सोनवाने, ई.एफ. देशमुख, हिवश्याम पाऊलझगडे, जलाराम बुध्देवार, कोमल नेवारे उपस्थित होते.
संटघनेच्यावतीने खंडविकास अधिकारी अशोक पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत-सत्कार करण्यात आला. या वेळी एन.बी. बिसेन, डी.व्ही. बहेकार, एल.यू. खोब्रागडे, अनिल टेंभुर्णीकर यांनी संघटनेचे ध्येयधोरणे व शिक्षकांच्या समस्यांची उकल केली. खंडविकास अधिकारी यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास आपण कटिबध्द असल्याचे सांगितले. तसेच शिक्षकांना वक्तशिरपणा व अपडेट राहण्याबाबत मार्गदर्शन केले.
संचालन वाय.आर. रहांगडाले यांनी केले. आभार बी.एस. केसाळे यांनी मानले.

Web Title: Teachers committee felicitates BDO Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.