शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

विश्वासघाती सरकारला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:45 IST

केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी मोठ मोठ्या घोषणांचा पाऊस केला होता. मात्र सत्तेवर येताच या सर्व घोषणांचा सरकारला विसर पडला आहे. मागील साडेचार वर्षांत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे एकही काम सरकारने केले नाही.

ठळक मुद्देवर्षा पटेल : राष्ट्रवादी काँग्रेस महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी मोठ मोठ्या घोषणांचा पाऊस केला होता. मात्र सत्तेवर येताच या सर्व घोषणांचा सरकारला विसर पडला आहे. मागील साडेचार वर्षांत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे एकही काम सरकारने केले नाही. उलट शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या विरोधी धोरणामुळे सर्वजण त्रस्त झाले. त्यामुळे जनतेचा विश्वासघात करणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकात धडा शिकविण्याचे आवाहन, मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी केले.तालुक्यातील तेजस्विनी लॉनमध्ये मंगळवारी (दि.२९) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तालुकास्तरीय महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष देवचंद तरोणे, भंडारा जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा कल्याणी भूरे, जि.प.सदस्य रमेश चुºहे, माजी जि.प.उपाध्यक्ष छाया चव्हाण, पं.स. सदस्य इंदू परशुरामकर, माजी नगराध्यक्ष रिता लांजेवार, पं.स. सदस्य सुधाकर पेंदरे, माजी पं.स. सभापती वंदना डोंगरवार, माजी नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, नगरसेवक चंद्रप्रभा मुनिश्वर, माजी जि.प. सदस्य किरण गावराणे, माजी पं.स. उपसभापती अनुसया लांजेवार उपस्थित होते. वर्षा पटेल म्हणाल्या, महिलांनी आता जागृत होण्याची गरज आहे. महिला मेळाव्याला उपस्थित महिलांची उपस्थिती पाहून महिला आता घराबाहेर पडू लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. महिलांनी चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित राहण्याचे दिवस आता संपले आहे. महिलांनी घराबाहेरपडून कुटुंब आणि समाजाचा विकास करण्याचे आवाहन केले. कुकडे म्हणाले की, भाजपा सरकारने या देशातील शेतकऱ्यांचा विचार न करता फक्त भांडवलदारांचाच विचार केला आहे.चंद्रीकापुरे म्हणाले मागील साडेचार वर्षात या सरकारने ना महिला,शेतकऱ्यांना किंवा बेरोजगारांना कोणालाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे अशा सरकारला त्यांची जागा देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक रजनी गिºहेपुंज यांनी मांडले. संचालन मंजू चंद्रीकापुरे व आभार मंजू डोंगरवार यांनी मानले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस