शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिभावंत खेळाडूंना संधीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 20:53 IST

ग्रामीण क्षेत्र ही प्रतिभावान खेळाडूंची खाण आहे. परंतु तेथील खेळाडूंना संधी व मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रतिभा दडपल्या जात आहेत. प्रतिभावंत खेळाडू आणि विशेषत: महिलांना खेळाची संधी उपलब्ध करुन देऊन मागील सात वर्षांपाूसन खेळाडू घडविणाऱ्या ‘भजेपार चषक’....

ठळक मुद्देपरमोद नरवाल : महिला-पुरुष कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : ग्रामीण क्षेत्र ही प्रतिभावान खेळाडूंची खाण आहे. परंतु तेथील खेळाडूंना संधी व मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रतिभा दडपल्या जात आहेत. प्रतिभावंत खेळाडू आणि विशेषत: महिलांना खेळाची संधी उपलब्ध करुन देऊन मागील सात वर्षांपाूसन खेळाडू घडविणाऱ्या ‘भजेपार चषक’ आयोजकांचे कार्य प्रशंसनीय असल्याचे मत हरियाणा स्टालर्स प्रो कबड्डी संघाचे खेळाडू परमोद नरवाल यांंनी शनिवारी (दि.७) येथे व्यक्त केले.भजेपार येथील सूर्योदय क्रीडा मंडळ, नवयुवक कबड्डी क्लब, संवेदना बहुउद्देशिय संस्था व समस्त ग्रामवासीयांच्या संयुक्त विद्यमाने सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे भजेपार चषक महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, काँग्रेस जिल्हा महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सखाराम राऊत, उपसरपंच कैलास बहेकार, उद्योगपती राजू काळे, प्राचार्य सागर काटेखाये, शामलाल दोनोडे, देवराम चुटे, माजी सैनिक अनंतराम कोरे, तंमुस अध्यक्ष कृष्णकुमार चुटे, खुशाल शिवणकर, इसराम बहेकार, संतोष बोहरे, हेतराम शहारे, खुशाल शिवणकर उपस्थित होते.उद्घाटनाच्या सामन्यात ५० ते ५५ वर्षावरील ज्येष्ठ खेळाडुंनी कबड्डी खेळून उपस्थितांना चकित केले. ७० ते ७५ वर्षाच्या दोन वयोवृध्द महिलांनी तरुण मुलींसोबत कबड्डी खेळून उपस्थितांचे लक्ष वेधले. याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी आणि कबड्डीच्या प्रतिभावंत खेळाडूंचा आ. पुराम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेत महाराष्टÑ, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील ७० पेक्षाही अधिक संघ सहभागी झाले आहे. ८ जानेवारीला रात्री ९ वाजता प्रो. कबड्डी खेळाडू प्रितम छिल्लर व शशांक वानखेडे यांच्या विशेष उपस्थितीत बक्षीस वितरण होणार आहे. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, संचालन रमसुला चुटे, आभार चंद्रकुमार पाथोडे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गावकरी परिश्रम घेत आहेत.