शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2015 01:48 IST2015-05-02T01:48:15+5:302015-05-02T01:48:15+5:30

शिक्षणाचा हक्क कायदा अंतर्गत प्राथमिक शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे शासनाने काढून घेतले आहेत.

Take out non-teaching tasks from the teachers | शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढा

शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढा


तिरोडा : शिक्षणाचा हक्क कायदा अंतर्गत प्राथमिक शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे शासनाने काढून घेतले आहेत. परंतु न.प. तिरोडा येथील प्राथमिक शिक्षकांकडून बीएलओची कामे तहसील कार्यालयामार्फत करवून घेतली जात आहेत. याचा परिणाम शैक्षणिक कार्यावर होत आहे़ तरीपण ही कामे त्वरित त्यांच्याकडून काढून घेण्यात यावे, असे निवेदन तहसीलदार विलास कोकवार यांना देण्यात आले आहे.
यापूर्वी ८ एप्रिललासुद्धा तिरोडा तहसीलदार यांंना बीएलओचे काम कमी करण्याबाबतचे निवेदन दिले होते. त्या निवेदनाची प्रतिलिपी प्रशासकीय अधिकारी न.प. तिरोडा यांना देण्यात आले होते. त्या निवेदनावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे समजते. त्यामुळे आजपर्यंत बीएलओचे काम शिक्षकांकडून कमी झालेले नाही.
शिक्षण संचालक म.रा.पुणे यांचे पत्र क्र. प्राथमिक शिक्षण संचालनालय म.रा. पुणे (०१/८१९ प्राशिस/आरटीई/अशै.कामे/५००/२०१५ दि. १८/०२/२०१५) महावीर माने शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय म.रा.पुणे यांच्या पत्रानुसार, बीएलओचे काम करण्यास आमचा नकार असल्यामुळे आमच्याकडे असलेली कामे तहसील कार्यालयाला परत करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर बीएलओ म्हणून आर.पी. पिदूरकर, एल.जी. बोपचे, एस.बी. खोटेले, एस.बी. ताराम, एन.एल. गोस्वामी, पि.एस. पारखी, एम.बी. भगत, जे.ए. बिसेन, व्ही.टी. निखाडे यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाची प्रतिलिपी शिक्षण संचालक (प्राथ.) शिक्षण संचालनालय म.रा. पुणे, उपविभागीय अधिकारी तिरोडा, प्रशासकीय अधिकारी न.प. तिरोडा यांना पाठविण्यात आलेल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Take out non-teaching tasks from the teachers