लघुउद्योगासाठी पुढाकार घ्या

By Admin | Published: December 18, 2014 01:24 AM2014-12-18T01:24:43+5:302014-12-18T01:24:43+5:30

सर्व मुलींनी आपल्या मोठ्या बहिणींना व जवळील इतर महिलांना लघुउद्योगाची माहिती द्यावी. त्यांनी प्रशिक्षणाबद्दलची माहिती देऊन स्वयंरोजगार करण्यासाठी तयार करावे, ....

Take the initiative for small scale industry | लघुउद्योगासाठी पुढाकार घ्या

लघुउद्योगासाठी पुढाकार घ्या

googlenewsNext

गोंदिया : सर्व मुलींनी आपल्या मोठ्या बहिणींना व जवळील इतर महिलांना लघुउद्योगाची माहिती द्यावी. त्यांनी प्रशिक्षणाबद्दलची माहिती देऊन स्वयंरोजगार करण्यासाठी तयार करावे, असे आवाहन नगराध्यक्ष कशिश जयस्वाल यांनी केले.
विद्यार्थिनींसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी न.प. व्दारा संचालित लघु उद्योगाबद्दल माहिती देऊन विद्यार्थिनींनी सर्वांगिन विकास साधण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी सुमंत मोरे होते. उद्घाटन नगराध्यक्ष जायस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून न.प.चे उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी, एस.एस. गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस.यू. गर्ग, पर्यवेक्षक रु.बी. बिसेन, जी.एस. ठाकूर, एम.एस. फुंडे उपस्थित होते.
सर्वप्रथम देवी सरस्वतीच्या फोटोला माल्यार्पण करून दीप प्रज्ज्वलित करण्यात आले. विद्यार्थिनींनी शारदा मातेची प्रार्थना व स्वागत गीत सादर केले. सर्वप्रथम मुख्याध्यापिका एस.यु. गर्ग यांनी अहवाल वाचन केले. त्यात शाळेच्या समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना माहिती करून दिली. न.प. उपाध्यक्ष रंगारी यांनी मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात न.प. शाळांच्या सर्व समस्या व अडचणी सोडविण्याची हमी दिली. यावेळी सी.बी. शहारे यांच्या मार्गदर्शनात लेझीम नृत्य सादर करण्यात आले. सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतरांनी आपले सहकार्य दिले. संचालन व्ही.आर. चव्हाण तर आभार बिसेन यांनी मानले.
यानंतर दुसऱ्या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलनाचे बक्षीस वितरण कार्यक्रम मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नुरजहा पठाण, मुख्याध्यापिका एस.यू. गर्ग, एन.बी. बिसेन व ठाकूर उपस्थित होते.
यावेळी आलेल्या शारीरिक, बौध्दीक, सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थिनींना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पर्यवेक्षक बिसेन यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी एस.एल. वैद्य, एन.बी. मोटघरे, एन.एम. यादव, वाय.बी. तुमसरे, के.एस. राणे, एस.एस. लिल्हारे, एम.एस. फुंडे, एस.डी. तुरकर, व्ही.आर. चव्हाण, एम.एस. गाडेकर, एस.सी. सारंगापुरे, सी.बी. शहारे, पिंकी सुखवानी व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Take the initiative for small scale industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.