शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

बीडीओवर कारवाई करा

By admin | Updated: May 21, 2017 01:51 IST

जून २०१६ मध्ये सडक अर्जुनी पंचायत समितीत आनंद लोकरे हे रुजू झाले. सुरुवातीपासूनच त्यांची कारकिर्द वादग्रस्त राहिली.

परशुरामकर यांची आयुक्ताकडे मागणी : सडक अर्जुनी पं.स.मध्ये वादग्रस्त खंडविकास अधिकारी लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जून २०१६ मध्ये सडक अर्जुनी पंचायत समितीत आनंद लोकरे हे रुजू झाले. सुरुवातीपासूनच त्यांची कारकिर्द वादग्रस्त राहिली. आता तर ७ एप्रिलपासून पंचायत समितीला त्यांचा पत्ताच नाही. यामुळे पंचायत समितीला नियमित खंड विकास अधिकारी नसल्याने विकास कामावर विपरित परिणाम झालेला आहे. त्यांच्यावर कारवाई करुन या पंचायत समितीला नवीन नियमित खंड विकास अधिकारी द्यावे, अशी मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी लेखी पत्राद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडे केलेली आहे. लोकरे यांच्या बाबतीत जिल्हा परिषद सभागृहात चर्चा करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे ठराव पारित झाले. पण सामान्य प्रशासन विभागाने पारित झालेल्या ठरावाची माहिती आयुक्त व ग्राम विकास विभागाला न दिल्याने पंचायत समितीवर ही वेळ ओढवलेली आहे. लोकरे यांना ज्या लोकप्रतिनिधींनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्यांना पंचायत समिती अंतर्गत गावातील विकास कामांशी काहीही घेणेदेणे नाही, असेच म्हणावे लागेल. आनंद लोकरे हे खंडविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती सडक अर्जुनी येथे १३ जून २०१६ ला रुजू झाले. तेव्हापासून त्यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली. ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता काही पंचायत समिती सदस्यांना हाताशी धरुन सुमारे ६३९ बॅनर प्रिंट छपायी केले व १४ आॅगस्टला ग्राम सेवकांना पंचायत समितीला बोलावून बॅनर वाटप केले. १५ आॅगस्ट संपल्यानंतर ग्राम सेवकांना बोलावून प्रति ग्रामपंचायत १० हजार ते १२ हजार रुपये बॅनरचे पेमेंट करा, असे आदेश दिले. ग्रामपंचायतने आम्हाला याबाबत काही माहिती नाही असे सांगून पेमेंट करणार नाही, अशी भूमिका घेतली. संबंधित प्रकरणाची तक्रार सरपंच संगठनेने मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया यांच्याकडे २५ आॅगस्ट २०१६ ला केली. तसेच हा विषय परशुरामकर यांनी सभागृहात आणल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मोरगाव अर्जुनीचे खंड विकास अधिकारी जमईवार यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करुन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश काढले. जमईवार यांनी चौकशी अधिकारी म्हणून २९ ग्राम सेवक व ४० ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच यांचे बयाण नोंदविले व २४ आॅक्टोबर २०१६ ला मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया यांना चौकशी अहवाल सादर केला. चौकशी अहवालानुसार ग्रामपंचायतला विश्वासात न घेता ६४९ बॅनरचे ग्रामपंचायतींना नियमबाह्य वाटप केले. यात खंडविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी पदाचा दुरपयोग केला, हे स्पष्ट झाले. त्यानंतर पंचायत समितीला विद्यमान उपसभापती यांनी बॅनरचे पेमेंट करण्यात खोडा घातला, अशी समज करुन लोकरे यांनी २९ नोव्हेंबर २०१६ ला पंचायत समितीमध्ये उपसभापतीच्या दालणात जावून उपस्थित लोकांनी कुठे आहे उपसभापती असे बोलून त्यांच्यावर स्वरक्षणासाठी असलेले रिवॉल्हवर (बंदूक) काढले. या प्रकरणात उपसभापतींनी ‘मला जिवे मारण्याची धमकी दिली’ अशी लेखी तक्रार आनंद लोकरे यांच्या विरोधात पोलीस ठाणे डुग्गीपारला ३० नोव्हेंबर २०१६ ला दिली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांनी केला. त्यामध्ये उपसभापतीच्या दालणात बसून असलेल्या ७ नागरिकांचे बयाण नोंदविण्यात आले. त्या बयानात सर्व लोकांनी लोकरे यांनी रिवॉल्हवर काढण्याचे सांगितले. फक्त पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात आपल्याला काही माहिती नाही, असे बयाण नोंदविले. कक्षात उपस्थित असलेल्या नागरिकांच्या बयाणावर गुन्हा नोंदविने आवश्यक होते. परंतु राजकीय दबावाखाली गुन्हा दाखल न करता बयाण देणाऱ्यांत एकसुत्रीपणा दिसून येत नाही, असा निष्कर्ष काढून लोकरे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. याबाबत परशुरामकर यांनी केलेल्या लेखी तक्रारीची चौकशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीला जावून केली. त्याचाही अहवाल पंचायत समितीत उपस्थित असलेल्या नागरिकांनी वस्तुनिष्ट बयाण नोंदवूनही उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत नाही. परंतु उद्भवलेल्या परिस्थितीनुसार पुन:श्च गंभीर स्वरुपाची घटना घडू नये म्हणून गटविकास अधिकारी लोकरे यांना इतरत्र बदली बाबदचा प्रस्ताव शासनास सादर आवश्यक आहे, असे नमूद केले. परंतु विभागीय आयुक्त नागपूर यांना अहवाल पाठवताना त्यांच्या बदलीबाबद साधा उल्लेखही करण्यात आला नाही. यावरुन याही चौकशीत त्यांना वाचविण्याचेच काम केले गेले. यानंतर खंडविकास अधिकाऱ्याने पंचायत समितीमध्ये येणे-जाणेच बंद केले. चार महिन्यांपेक्षा अधिक काळ अनुपस्थित आता तर चक्क ७ एप्रिल २०१७ पासून खंडविकास अधिकारी आनंद लोकरे हे पंचायत समितीला नाहीत. लोकरे रुजू होऊन जवळपास ११ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पण या ११ महिन्यात जवळपास ४ महिन्यांपेक्षा जास्त काळ सुटीवर राहिलेले आहेत. एवढ्या सुट्ट्या जि.प. सामान्य प्रशासन विभागाने मंजूर केल्याच कशा? लोकरे यांच्यामुळेच पं.स. स्तरावर होणाऱ्या मिनी अंगणवाडी सेविकेच्या भरत्या रखडलेल्या आहेत. तसेच सोफा व खुर्च्या घेण्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे अशा वादग्रस्त खंडविकास अधिकाऱ्यांची तातडीने बदली करुन या पंचायत समितीत नियमित खंड विकास अधिकारी द्यावा, अशी मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे केली आहे.