लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवण्याच्या आदेशामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली होती. देशव्यापी संचारबंदीमुळे शेतकºयांचा मुख्य बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सर्व दळणवळणाची साधने नसल्याने हंगाम वाया जातो की काय असे वाटत असताना तालुका कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व क्षेत्रिय अधिकारी-कर्मचाºयांनी आदिवासी नक्षलग्रस्त दुर्गम क्षेत्रात बी-बियाणे, खते, किटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी कृषी निविष्ठा बांधावरच पोहचविली जात आहे.या नाविण्यपूर्ण कार्यक्रमामध्ये देवरी विभागातील शेतकरी गट, कृषी सेवा केंद्र यांनीही सहभाग घेतला व शासनाची मोहीम यशस्वी केली आहे. तसेच या कार्यक्रमात ककोडी येथील कृषोन्नती शेतकरी कंपनीच्या सर्व शेतकरी सदस्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे कंपनीकडे नोंदणीधारक व इतर शेतकऱ्यांना बांधावरच कृषी निविष्ठा पोहचत्या करण्यात यश आले आहे. यासाठी तालुका कृषी अधिकारी जी.जी.तोडसाम, मंडळ कृषी अधिकारी विकास कुंभारे, आत्माच्या स्वप्ना लांडगे, सिद्धार्थ राऊत, कृषी सहायक सचिन गावळ, कृषोन्नती शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मनेंद्र मोहबंशी, संचालक मनोज मेश्राम, चंदन हिरवानी व कृषी निविष्ठा खरेदी करणारे शेतकरी गट प्रमुख व इतर शेतकरी सहकार्य करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठांचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST