वृद्धाची विष प्राशन करून आत्महत्या
By admin | Published: May 24, 2015 01:33 AM2015-05-24T01:33:53+5:302015-05-24T01:33:53+5:30
जादूटोण्याच्या संशयातून मारहाण झाल्याची खंत डोक्यात ठेऊन वृद्धाने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.
पांढरी : जादूटोण्याच्या संशयातून मारहाण झाल्याची खंत डोक्यात ठेऊन वृद्धाने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. जवळील ग्राम हलबीटोला येथे दुपारी ही घटना उघडकीस आली. मृताचे नाव राजाराम सुका नाईक (६५) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजाराम नाईक हे घरच्या गायी व म्हशी चारण्यासाठी पलीकडच्या शेतात गेले होते. तेथे त्यांना जादूटोण्याच्या संशयातून संशयीत आरोपी ओंकार काटेवार (४५), अनिल केजू कवास (२२), संदीप शालीकराम काळे (२२), सेवंता केचू कवास (रा.पांढरी) यांनी सकाळी ११ वाजता दरम्यान मारहाण केली. दरम्यान मृत राजाराम घरी गेले. मात्र मारहाण झाल्याची खंत डोक्यात असल्याने त्यांनी इंडोफेन नावाचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.
घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती मिळताच शेजाऱ्यांनी पोलीस पाटील उत्तम कोटांगले यांना माहिती दिली. त्यांनी त्वरीत डुग्गीपार पोलिसांना कळविले.
विशेष म्हणजे मृत राजाराम यांचा मुलगा व सून लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले आहेत. प्रकरणाची चौकशी ठाणेदार राजकुमार केंद्रे, बीज जमादार नाकाडे व कोरे करीत आहेत.(वार्ताहर)