शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

श्रमातून फुलले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:08 AM

येथील काही युवकांनी एकत्र येवून दुर्लक्षित असलेल्या पवन तलावाचा विकास करण्याचा संकल्प करुन तो तडीस नेला. तब्बल ४५ रविवार पवन तलावाच्या ठिकाणी युवकांनी श्रमदान करुन या तलावाचा कायापालट केला.

ठळक मुद्देयुवकांनी एकत्र येवून दुर्लक्षित असलेल्या पवन तलावाचा विकास करण्याचा संकल्प

गोरेगाव : येथील काही युवकांनी एकत्र येवून दुर्लक्षित असलेल्या पवन तलावाचा विकास करण्याचा संकल्प करुन तो तडीस नेला. तब्बल ४५ रविवार पवन तलावाच्या ठिकाणी युवकांनी श्रमदान करुन या तलावाचा कायापालट केला. येथील आशीष बारेवार यांनी या तलाव परिसराचा पर्यटन केंद्राच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्याला गावातील इतर युवकांनी साथ दिली. त्यामुळेच गोरेगाव येथील पवन तलाव अल्पावधीतच नावारुपास आले. या तलाव परिसराला भेट दिल्यानंतर आणि तेथील नैसर्गिक सौंदर्य पाहून प्रत्येकाच्या मुखात केवळ एकच वाक्य असते. ते म्हणजे युवकाच्या श्रमदानातून पवन तलावाचे नंदनवन झाले. युवकांनी परिसराचा विकास केला. शिवाय टाकाऊ वस्तुंचा उपयोग करून परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घातली. तलावाच्या परिसरात कुटी तयार केल्या. टाकाऊ टायरला रंगरगोटी करुन त्याचा उपयोग वृक्षांसाठी कठडे म्हणून केला. तर टाकाऊ रंगाच्या डब्यांचा उपयोग पक्ष्यांसाठी घरटे तयार करण्यासाठी केला. पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली असून झाडांना पाण्याचे पात्र लावले.(छायाचित्र: दिलीप चव्हाण)