Study level for hundred percent progress | शंभर टक्के प्रगतीसाठी अध्ययन स्तर निश्चिती
शंभर टक्के प्रगतीसाठी अध्ययन स्तर निश्चिती

ठळक मुद्देजि.प. शाळांमध्ये राबविणार उपक्रम। गुणवत्ता वाढीवर भर

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिक्षण विभागाने उत्कृष्ट कार्यात आणखी एक भर टाकली जात आहे. शंभर टक्के विद्यार्थी व शाळा विकसीत करण्यासाठी आता नागपूर विभागात ‘अध्ययन स्तर निश्चिती व गुणवत्ता विकास कार्यक्रम’ शैक्षणिक सत्र २०१९-२० पासून सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील १३८४ शाळांचा समावेश राहणार आहे.
या उपक्रमातंर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित व अंशत:अनुदानित शाळांना दुसरी ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना अध्ययनस्तर निश्चिती तपासणीच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल.तपासणीत भाषा व गणित विषयाचा अध्ययनस्तर निश्चित केला जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मूलभूत क्षमता प्राप्त करण्यात विद्यार्थ्यांना जी समस्या येते, ती समस्या सोडविण्यासाठी मदत होणार आहे.
कार्यक्रमांतर्गत भाषा व गणित विषयाच्या तपासणीसाठी शाळांना टेस्टिंग टूल्स उपलब्ध करवून दिले जाणार आहेत. या अंतर्गत प्रारंभ,मध्यम व अंतिम चाचणी होईल. या उपक्रमासाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तरावर जिल्हा साधन व्यक्ती (डीआरपी) समितीत १३ लोकांचा समावेश आहे. समितीचे प्रशिक्षण २६ ते २९ जुलै दरम्यान नागपूर येथे घेण्यात येणार आहे.यानंतर जिल्ह्यात तालुका साधन व्यक्ती (बीआरसी) चे प्रशिक्षण होईल.
या समितीत १३ लोकांचा समावेश राहणार आहे. या समितीद्वारे केंद्रीय साधन गट (सीआरजी) ला पहिले प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या गटात १५ जणांचा समावेश राहील. हा गट केंद्र स्तरावर काम करणार आहे.महाराष्ट्र सरकारने २२ जून २०१५ ला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
यातून ज्ञानरचनावाद, लोकसहभागातून डिजीटल शाळा, एबीएल (कृतीयुक्त अध्यापन), आयएसओ शाळा निर्मिती, सीएसआर (कार्पोरेट सोशल रिसपॉन्सिब्लिटी), पीएसआर (पब्लिक सोशल रिसपॉन्सिब्लिटी) सारख्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांना हॉयटेक विद्यार्थी करण्याचे काम सुरू करण्यात आले.
वाचन आनंद दिवस, वाचन प्रेरणा दिवस यासारखे उपक्रमही राबविण्यात आले.आता मुख्यमंत्र्यांकडून शालेय शिक्षण विभागाला दिलेल्या केआरए (राऊंड एरिया) अनुसार शंभर टक्के स्कूल व प्रगत विद्यार्थी हा उद्देश ठेवण्यात आला आहे.

शेजारच्या राज्यांच्या बोलीभाषेचा पडतो प्रभाव
छत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेला लागून गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा व गोंदिया तालुक्याची सीमा लागून आहे. या तिन्ही तालुक्याच्या विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेवर या दोन राज्याच्या बोलीभाषेचा प्रभाव पडतो. या प्रकारे काही तालुके आदिवासी बहुल असल्यामुळे स्थानिक बोलीभाषेचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडतो.या विपरीत परिस्थितीत ‘असर’ सर्वेक्षण २०१६ च्या अहवालात गोंदिया जिल्हा राज्यात ११ व्या क्रमांकावर होता. सन २०१८ मध्ये ७ व्या क्रमांकावर राज्यात तर विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता.


Web Title: Study level for hundred percent progress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.