शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्ने बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 9:36 PM

राज्यातील ६१ टक्के आदिवासी समाज हा आजही दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाणही कमी आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील ६१ टक्के आदिवासी समाज हा आजही दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाणही कमी आहे. शिक्षणाच्या कमी प्रमाणामुळे विविध क्षेत्रातील नोकºयांमध्ये आदिवासी बांधव कमी आहेत. शासन आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक योजना असून विद्यार्थ्यांनी मोठे बनण्यासाठी मोठी स्वप्ने बघावी व त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.सडक/अर्जुनी येथे १७ नोव्हेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी कार्यालयाच्या वतीने बांधण्यात आलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण व विविध योजनांच्या साहित्याचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती कविता रंगारी, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.माजी समाजकल्याण सभापती श्रावण राणा, माजी पं.स.सभापती संतोष मडावी, लक्ष्मीकांत धानगाये, आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त दिपक हेडावू, उपविभागीय अभियंता प्रकाश लांजेवार, शाखा अभियंता ताकसांडे, वासनिक, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी घुले, प्राचार्य जाधव यांची उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले की, आदिवासी मुले ही शरीराने काटक असतात. खेळाच्या मैदानात ते आपली कर्तबगारी सिध्द करतात. त्यांना जर अ‍ॅथलेटिक्ससारख्या क्रीडा प्रकारात चांगले मार्गदर्शन मिळाले तर ते मोठी झेप घेवू शकतात. घरची परिस्थिती चांगली नाही त्यामुळे शिक्षण घेता येत नाही ही मानिसकता दूर झाली पाहिजे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे तरच प्रगती होईल, सोबतच बेरोजगारी कमी होण्यास सुध्दा मदत होईल.विदेशात सुध्दा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा आदिवासी विकास विभागामार्फत उपलब्ध करु न देण्यात येत आहे. अनेक आदिवासी बांधवांच्या पिढ्या दारिद्रयरेषेखाली जगल्या, पण येणाºया पिढ्यांनी चांगले शिक्षण घेवून आपली प्रगती करावी असे, आवाहनही त्यांनी केले.आ. पुराम म्हणाले की वसतिगृहाच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक मोठ्या व्यक्ती वसतिगृहात शिक्षण घेवून मोठ्या पदावर गेले आहेत. वसतिगृहात राहतांना विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. चांगले शिक्षण घेवून शिक्षणाच्या माध्यमातून वसतिगृहाचा नावलौकीक करावा. विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या चरित्राचे वाचन करु न त्यांचा आदर्श पुढे ठेवून शिक्षण घ्यावे, असेही ते म्हणाले.जि.प. उपाध्यक्ष गहाणे म्हणाल्या की रस्ते, इमारती हा विकास नसून आदिवासींची मुले-मुली शिक्षीत झाली तरच विकास झाला असे म्हणता येईल. सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या तर त्यांच्या विकासाला गती मिळेल. आदिवासी विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे असे त्या म्हणाल्या.प्रारंभी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते नव्यानेच बांधण्यात आलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.नाविण्यपूर्ण योजनेतून क्रीडा विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश व कीट देण्यात आली. आदिवासी लाभार्थ्यांना विविध योजनांच्या साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला आदिवासी वसतिगृहातील मुले-मुली त्यांचे पालक व विविध आदिवासी योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार जव्हार गाढवे यांनी मानले.