शहरं
Join us  
Trending Stories
1
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
2
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
3
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
4
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
5
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
6
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
7
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
8
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
9
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
10
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
11
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
12
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
13
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
14
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
15
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
16
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
17
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 
18
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
20
दुर्गापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन तरुणांना अटक; सुवेंदू अधिकारी यांनी केली एन्काउंटरची मागणी

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 10:20 IST

वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.

गोंदिया : शहरातील फुलचूर परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे एक पट्टेदार वाघ शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास फिरत असताना य परिसरातील नागरिकांना आढळला. याची माहीती लगेच वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. यानंतर वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. तब्बल तीन तासांच्या रेस्क्यू आपरेशनंंतर वाघाला जेरबंद करण्यात यश आले. यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला नागरिकांना वाघ दिसल्याने एकच खळबळ उडाली व भीतीचे वातावरण निर्माण झाले तर वाघ दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरतातच परिसरातील लोकांनी वाघ बघण्यासाठी गर्दी केली होती. यानंतर याची माहिती पोलिस व वन विभागाला मिळतातच घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे याच परिसरात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व अधिकारी व कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. हा परिसर शहराबाहेर नाल्यालगत असून परिसरात झाडेझुडपे आहेत. या बरेचदा वन्यप्राणी आढळतात. मात्र शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक पट्टेदार वाघ आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाघाला रेस्क्यू करण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली. तीन तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाने वाघाला बेशुद्ध करत रेस्क्यू केले आहे. वाघाला जेरबंद केल्यानंतर परिसरातील  नागरिकांनी सुटकेच्या श्वास सोडला.  हा वाघ काही दिवसांपूर्वी आमगाव परिसरात दिसला होता हा तोच वाघ असल्याची माहिती आहे.

वन्यप्राण्यांची शहराच्या दिशेने धाव

मागील काही दिवसांपूर्वी शहरात अस्वल आणि हरणांचा शिरकाव झाला होता. त्यानंतर आता जिल्हाधिकारी परिसरात वाघ आढळला. त्यामुळे वन्यप्राणी शहराच्या दिशेने धाव घेत असल्याचे चित्र आहे. मात्र यामुळे शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tiger spotted near Gondia Collector office, rescued after 3-hour operation.

Web Summary : A tiger was spotted near the Gondia Collector's office, causing panic. Forest officials launched a three-hour rescue operation, successfully capturing the animal. The tiger was previously seen in the Amgaon area.
टॅग्स :Tigerवाघ