लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील मुख्य शहराच्या मध्यभागी असलेल्या भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत शुक्रवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली.येथील भारतीय स्टेश्न बँक येथे ८ डिसेबर दुसरा शनिवार सुटीचा दिवस असल्याने शुक्रवारी रात्री ८ वाजतापर्यंत बँकेत कर्मचारी काम करीत होते. त्यानंतर कर्मचारी ८ वाजनंतर बँक बंद करुन घरी गेले. पण शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी बँके बाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून केबल कापले. तर बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप कटरने तोडून बँकेत प्रवेश केला. त्यानंतर चोरांनी बँकेच्या आत मुद्देमालाचा शोध घेत कॅशरुम आणि लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. लॅकरचे कुलूप न तुटल्याने त्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे चोरांनी बँकेतील साहित्य अस्ताव्यस्त केले. मात्र यावेळी बँकेत लावलेले सायरन वाजले नाही हे विशेष. रात्री ८ वाजेपर्यंत बँकेत काम करणाºया कर्मचाºयांनी बँकेची रोकड, मुद्देमाल असलेल्या लॉकरचे कुलूप बंद असल्याची खातर जमा करुन घेतली होती. त्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. शनिवारी (दि.९) सकाळी ग्राहकांना बँकेतील मुख्य प्रवेश द्वारावरील कुलूप तुटलेले आढळल्याने त्यांनी याची माहिती बँक व्यवस्थापकाला दिली.या वेळी बँक प्रशासनातील कर्मचारी, पोलीस प्रशासनाने बँकेत धाव घेत माहिती घेतली. दरम्यान या घटनेमुळे आमगाव येथे चांगलीच खळबळ उडाली आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. या घटनेचा तपास आमगाव पोलीस करित आहेत.सर्वाधिक चोरीच्या घटना शुक्रवारीचआमगाव येथे दर शुक्रवारला आठावडी बाजार भरतो. मध्य सिमेलगतचा मोठे बाजारपेठ असल्याने व्यावसायीक व खरेदी धारकांसाठी वर्दळ असतो. त्यामुळे शुक्रवारी चोरांसाठी सोईचा दिवस आहे. आमगाव परिसरात घडणाºया अनेक चोरींच्या घटना या शुक्रवारच्या मध्यरात्री घडलेल्या आहेत. भारतीय स्टेट बँक येथे यापूर्वीही चोरीचा अयशस्वी प्रयत्न झालेला आहे. आमगाव येथे शुक्रवारला होणाºया चोरीच्या घटनेमुळे शुक्रवार दिवस चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना आव्हान ठरले आहे.चोरांचा शंोध सुरूबँकेत मध्यरात्री चोरांनी मुख्य प्रवेशद्वारावरील कुलूप तोडून बँकेत चोरीचा प्रयत्न केला. चोरीचे गांभीर्य घेवून आमगाव पोलीस प्रशासनाने प्रत्येक बाबीचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. श्वानपथकाच्या मदतीने चोरांचा सुगावा घेतला. परंतु आंबेडकर चौक पर्यंतच जाऊन श्वान परते. रात्री उशिरापर्यंत श्वान पथकाच्या मदतीने चोरांचा शोध घेण्यात येणार आहे.बँकेत सुरक्षा रक्षक नाहीयेथील बँकेच्या शाखेतून दररोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात. मोठ्या प्रमाणात रोख रक्कमेची देवाण- घेवाण होते. तर अनेक लॉकरमध्ये ग्राहकांच्या मोल्यवान परंतु ठेवल्या आहेत. मात्र बँकेत रात्रपाळीतील सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एसबीआय बँकेत चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:32 IST
येथील मुख्य शहराच्या मध्यभागी असलेल्या भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत शुक्रवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
एसबीआय बँकेत चोरीचा प्रयत्न
ठळक मुद्देसीसीटिव्ही कॅमरे तोडले : मध्यरात्रीच्या सुमारासची घटना