शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ठरला अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:50 IST

सन १९१९ मध्ये स्थापना झालेल्या गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. आजवर तसाच कारभार चालत असला तरी प्रकल्प नसल्याचा फटका नगर परिषदेला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बसला. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सर्वेक्षणात कमी गुण मिळाले.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणात घसरण : जागेच्या शोधात प्रकल्प रखडला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन १९१९ मध्ये स्थापना झालेल्या गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. आजवर तसाच कारभार चालत असला तरी प्रकल्प नसल्याचा फटका नगर परिषदेला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बसला. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सर्वेक्षणात कमी गुण मिळाले. तिथेच शहराची रँकींग घसल्याची माहिती आहे. यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील घसरणीला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पच कारणीभूत ठरल्याची माहिती आहे.स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत नगर परिषदांना विविध प्रकारचे मुद्दे ठरवून देत त्यावर गुणांकन केले जाते. स्वच्छ सर्वेक्षण असल्याने घनकचरा व्यवस्थापन ही बाब मुख्य राहणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशात शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन कुठे व कसे केले जाते हा विषय येणार होताच. मात्र नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पच नसल्याने स्वच्छ सर्वेक्षणात हीच बाब कमकुवत ठरली व नेमके येथेच कमी गुण पडल्याची माहिती आहे. मागील वर्षी केंद्रात ७६ व राज्यात १७ व्या क्र मांकावर असलेले गोंदिया शहर यंदा घसरले असून केंद्रात १२९ तर राज्यात ३५ व्या क्रमांकावर आले आहे.गोंदिया नगर परिषदेची स्थापना १९१९ मध्ये झाली. म्हणजेच, आता शंभरीत असलेल्या गोंदिया नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसणे ही आश्चर्यजनक व तेवढीच संतापजनक आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पासाठी नगर परिषदेने जागा शोधली मात्र तेथे काही ना काही अडचण येत असल्याने प्रकल्प रेंगाळत चालला आहे. परिणामी आजपर्यंत नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभे झाले नाही. मात्र यासाठी १०० वर्षांचा काळ लागणे हे काही संयुक्तीक वाटत नाही.अखेर त्याचा फटका नगर परिषदेला बसत आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात नगर परिषदेला डच्चू मिळालाच. जिल्ह्यातील लहान लहान नगर पंचायती सुध्दा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारत असताना गोंदिया नगर परिषद यात मागे पडणे हा सुध्दा आश्चर्याचा विषय आहे.संबधित अभियंत्याचा मोबाईल नेहमीच बंदस्वच्छ सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आलेल्या संबंधित अभियंत्याला कोणतीही माहिती मागण्यासाठी मोबाईलवर संपर्क केल्यास त्यांना मोबाईल नेहमीच बंद राहतो. त्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या विषयाला घेऊन काय सुरू आहे जाणून घेणे कठीण झाले आहे. मोबाईल बंद ठेवण्याच्या या सवयीमुळे नागरिकांसह खुद्द नगर परिषद अधिकारीही वैतागले आहेत. मुख्याधिकारी सुद्धा ही बाब जाणून आहेत. मात्र आतापर्यंत अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही हा सवाल मात्र गुलदस्त्यात आहे.प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडेनगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व्हावा यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या पुढाकाराने ग्राम रतनारा येथे जागा पाहण्यात आली आहे. मात्र त्या जागेसाठी लागणाºया विविध परवानगींसाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला आहे. यावर जिल्हाधिकाºयांनी एक समिती तयार केल्याची माहिती प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांच्याकडून मिळाली.मात्र आता त्यावर लवकरच कारवाई होणे अपेक्षीत असून असे झाल्यास लवकरच प्रकल्प उभारता येईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.