सरपंचांनी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 09:50 PM2017-12-28T21:50:48+5:302017-12-28T21:51:26+5:30

दिशाभूल करणाऱ्या नेत्यांपासून सावध राहा. शासन शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी विविध चांगल्या योजना राबवित आहे. त्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत सरपंचांनी पोहोचवावा, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

Sirpanches should bring benefits of schemes to the masses | सरपंचांनी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवावा

सरपंचांनी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवावा

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : सरपंच-उपसरपंच सत्कार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा: दिशाभूल करणाऱ्या नेत्यांपासून सावध राहा. शासन शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी विविध चांगल्या योजना राबवित आहे. त्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत सरपंचांनी पोहोचवावा, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने करियर मार्गदर्शन व नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात ते अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करीत होते.
उद्घाटन आमदार डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख म्हणून नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. खोमेश्वर रहांगडाले, सीता रहांगडाले, उमाकांत हारोडे, कृऊबासचे सभापती चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, न.प. उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, विश्वजित डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच, उपसरपंच यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या वेळी आ. विजय रहांगडाले यांनी अटलबिहारी बाजपेयी यांनी दाखविलेल्या पंचायतराज योजनेचे पालन करुन गावाचा विकास करण्याचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी आज आम्ही सुशासन दिनानिमित्त संपूर्ण क्षेत्रातील सरपंच-उपसरपंच यांचा सत्कार व मेळावा घेत आहोत. हा राजकारणाचा भाग नसून माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या सुराज्याचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी सदर कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करीत असल्याचे आ. रहांगडाले यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.
संचालन माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले. आभार नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस, तुमेश्वरी बघेले, डॉ.बी.एस. रहांगडाले, पवन पटले, रमणीक सोयाम, भाऊराव कठाणे, सलाम शेख, छत्रपाल तुरकर, पंकज रहांगडाले, डॉ. रामप्रकाश पटले, गौरीशंकर पारधी, महेंद्र बघेले, बालू समरीत, संजय पारधी, संजय खियानी, राजेश मलघाटे, पवन लांजेवार, टूंडीलाल शरणागत, संध्या भरणे, यशवंत कांबडी, सुनील बन्सोड, अनूप बोपचे, मधू टेंभरे, प्रभू सोनवाने, ललीत परिहार, रवी चामट, राजेश रहांगडाले, कैलाश कटरे, पुरनलाल पटले, गिरीश बांते, श्वेता मानकर, अशोक असाटी, विजय बन्सोड, राखी राजेश गुणेरिया, संतोष मोहने, राजेश गुणेरिया, अनिता अरोरा, भावना चवळे, तेजराम चव्हाण, श्रावण रहांगडाले, भूमेश्वर रहांगडाले, दिनेश चोभरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Sirpanches should bring benefits of schemes to the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.