शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब आम्हाला बारदाना उपलब्ध करुन द्या हो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

यंदा रब्बी हंगामाचे धान विक्री करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने अद्यापही बारदाना उपलब्ध करुन दिला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीस नेण्याची अडचण निर्माण होत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना लवकर धानाची विक्री करुन खरीप हंगामपूर्व शेतीची कामे करायची आहे. मात्र अद्याप बारादान उपलब्ध करुन न दिल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : महामंडळाचे झाले दुर्लक्ष, धान विक्रीची समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : स्थानिक ठिकाणच्या आदिवासी विविध सेवा सहकारी संस्था येथे शेतकऱ्यांना उन्हाळी धानपिक शासनाला विकण्यासाठी बारदानाच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना धानाची विक्री करण्यास अडचण जात आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून बारादाना उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून आदिवासी विकास विभागातंर्गत चालणाऱ्या सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेत जवळपासच्या १३ गावातील शेतकरी सभासद आहेत. शेतकरी आपले रब्बी व खरीप हंगामाचे धान या संस्थेमार्फत शासनाला विक्र ी करतात. पण यंदा रब्बी हंगामाचे धान विक्री करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने अद्यापही बारदाना उपलब्ध करुन दिला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीस नेण्याची अडचण निर्माण होत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना लवकर धानाची विक्री करुन खरीप हंगामपूर्व शेतीची कामे करायची आहे. मात्र अद्याप बारादान उपलब्ध करुन न दिल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होत आहे. त्यातच ३० जूनपर्यंतच शासकीय धान खरेदी केंद्र सुरू राहणार असल्याने तेवढ्याच कालावधी शेतकऱ्यांना धानाची विक्री करता येणार आहे. अन्यथा खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धानाची विक्री करावी लागेल. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.महामंडळाच्या संचालकांनी द्यावे लक्षआदिवासी विकास महामंडळातंर्गत आदिवासी बहुल भागात हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र मागील दोन वर्षांपासून खरेदी प्रक्रियेकडे महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे याकडे महामंडळाच्या संचालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.महामंडळाकडून आमच्या संस्थेला बारदाना अद्यापही उपलब्ध करुन देण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बारदाना देण्यात आलेला नाही. बारदाना उपलब्ध होताच तो दिला जाईल.- एल.बी.बागडे, सचिव, आदिवासी विविध सेवा सहकारी संस्था,बाराभाटीबारदाना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. महामंडळाच्या संचालक व विभागीय व्यवस्थापक यांच्याशी बोलणे झाले आहे. येत्या दोन तीन दिवसात शेतकऱ्यांना बारदाना उपलब्ध होईल.- राहुल पाटील, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, नवेगावबांध

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड