शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

लेटलतीफ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 21:29 IST

येथील पंचायत समितीच्या सभापती माधुरी टेंभरे यांनी बुधवारी (दि.५) दुपारी ४ वाजता अचानक पंचायत समितीच्या विविध विभागाना भेट दिली. या दरम्यान शिक्षण, समाज कल्याण, कृषी विभागातील चार कर्मचारी अनुउपस्थित आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश प्रभारी खंडविकास अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देसभापतींची विभागांना आकस्मिक भेट : कर्मचाºयांमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील पंचायत समितीच्या सभापती माधुरी टेंभरे यांनी बुधवारी (दि.५) दुपारी ४ वाजता अचानक पंचायत समितीच्या विविध विभागाना भेट दिली. या दरम्यान शिक्षण, समाज कल्याण, कृषी विभागातील चार कर्मचारी अनुउपस्थित आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश प्रभारी खंडविकास अधिकाऱ्यांना दिले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.विदर्भ एक्सप्रेस आल्याशिवाय जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरू होत नाही असे म्हटले जाते. मात्र आता काही कर्मचाऱ्यांनी विदर्भने येवून विदर्भनेच जाण्याचा जणू संकल्प केला असल्याने दुपारी ३ वाजतानंतरच बऱ्याच शासकीय कार्यालयात शुकशुकाट असतो. त्यामुळे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आल्या पावलीच परत जावे लागते.या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुध्दा लक्ष नसल्याने कर्मचाऱ्यांचा अपडाऊनचा प्रवास नियमित सुरू आहे. बरेच कर्मचारी तर विदर्भ एक्सप्रेसने येतानाच आज विदर्भ ने परत जायचे की अहमदाबाद गाडीने परत जायचे याचे वेळापत्रक तयार करतात.त्यामुळे हे कर्मचारी कार्यालयात किती तास काम करीत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. जिल्ह्यातील किती अधिकारी व कर्मचारी दररोज विदर्भ एक्सप्रेसने अपडाऊन करतात हे बघायचे असेल तर ही गाडी येण्याच्या वेळी गोंदिया रेल्वे स्थानकासमोर उभे राहिल्यास दिसून येईल.यासर्व प्रकारामुळे नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याचीच दखल सभापती माधुरी टेंभरे यांनी बुधवारी पंचायत समितीच्या विविध विभागाना अचानक भेट दिली.या वेळी शिक्षण विभागात डी. एच. पटले, समाज कल्याण विभागात ए.जी.राठोड व कृषी विभागात डी.के. रामटेके, व्ही. डी. मरस्कोल्हे हे कर्मचारी अनुउपस्थित होते. तर कार्यालयाच्या हलचल रजिस्टरची तपासणी केली असता त्यात दौरा दाखविला होता. मात्र स्वाक्षरी केली नव्हती, त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश टेंभरे यांनी दिले. तसेच प्रभारी खंडविकास अधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नजर ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले.यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सभापतींच्या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत रुषीपाल टेंभरे, पत्रकार दिलीप चव्हाण, डिलेश्वर पंधराम, पंचायत विभागाचे ब्राम्हणकर, शंकर पारधी उपस्थित होते.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीEmployeeकर्मचारी