शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या प्रचारपत्रकावर शिवसेना सहप्रमुखांचे छायाचित्र, एकच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 12:58 IST

सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात असताना भाजपच्या वतीने मात्र शिवसेनेचे सहसपंर्क प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या छायाचित्राचा वापर आपल्या प्रचार साहित्यावर वापरण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देराजकीय खळबळ

गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या उर्वरित ३० जागांसाठी येत्या १८ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर धरू लागला आहे. त्यातच सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांसाठी कंबर कसलेली असताना व सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात असताना भाजपच्या वतीने मात्र शिवसेनेचे सहसपंर्क प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या छायाचित्राचा वापर आपल्या प्रचार साहित्यावर वापरण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या प्रकारामुळे भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या चेहऱ्याची गरज आहे असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या ओबीसी गटातील सर्वसाधारण झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती जागासाठी सध्या प्रचार सुरू आहे.

दवनीवाडा मंडळाचे भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष पप्पू अटरे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भाजप नेत्यांसोबतच शिवसेना सहसंपर्कप्रमुख मुकेश शिवहरे यांचे छायाचित्रसुद्धा प्रकाशित करण्यात आले आहे. ते सुद्धा माजी आमदार खोमेश्वर रहागंडाले व भजनदास वैद्य यांच्या आधी व भाजपचे संघटनमंत्री वीरेंद्र अंजनकर यांच्यानंतर त्यांचे छायाचित्र पत्रकावर प्रकाशित करण्यात आल्याने शिवहरेंची भाजपला या निवडणुकीत गरज भासली का अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना

बुधवारी (दि.१२) रतनारा जिल्हा परिषद गटातील डोंगरगाव व रतनारा पंचायत समितीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पत्रकावर शिवहरेंचे छायाचित्र वापरले गेल्याने शिवसेनेतही खळबळ माजली आहे. दरम्यान, भाजपकडून अनवधनाने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. मात्र काही का असेना भाजपला शिवसेने वाचून कमरेना अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेनाzpजिल्हा परिषद