गोंदिया येथे शिव भोजन केंद्र सुरु ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST2021-06-11T04:20:41+5:302021-06-11T04:20:41+5:30

गोंदिया : जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल सातत्याने प्रयत्नशील आहेत. याच अनुषंगाने दोन्ही ...

Shiv Bhojan Kendra started at Gondia () | गोंदिया येथे शिव भोजन केंद्र सुरु ()

गोंदिया येथे शिव भोजन केंद्र सुरु ()

गोंदिया : जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल सातत्याने प्रयत्नशील आहेत. याच अनुषंगाने दोन्ही जिल्ह्यात शिव भोजन केंद्र मंजूर करण्यात आले आहे. शुक्रवारी गोंदिया मरारटोली शिवांश रेस्टॉरंट येथे शिव भोजन केंद्राचे उद्घाटन माजी आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांच्या उपस्थित करण्यात आले.

या शिव भोजन केंद्राच्या माध्यमातून गरीब व गरजवंताना भोजन मिळणार आहे. कोरोना संक्रमणाच्या संकट काळात परिसरातील गरीब लोकांना निःशुल्क भोजन मिळणार आहे. संकटकाळात कोणताही गरीब व्यक्ती उपाशी राहणार नाही याकरिता शिव भोजन केंद्राचा लाभ गरजवंतानी घ्यावा असे जैन यांनी यावेळी माजी आ. जैन यांनी सांगितले. यावेळी विनोद हरिणखेडे, प्रभाकर दोनोडे, गणेश बरडे, केतन तुरकर, सुनील पटले, शैलेश वासनिक, सौरभ रोकडे, एकनाथ वहिले, संजीव राय, नागो बंसोड़, लव माटे, पिंटू बावनकर, आकाश खोब्रागडे, आसिफ सैय्यद, कुणाल ढेकवार, पंकज गजभिये, कपिल बावनथड़े, कुणाल बावनथड़े, मोनू मेश्राम, विकास अवस्थी, नरेंद्र बेलगे, प्रदीप मदनकर, विक्की माने, मोंटू दानी, विक्की अवस्थी, तीर्थराज हरिणखेडे, अंकित राऊत, संजय कैथवास, आनंद पटले, रवि सपाटे, महेन्द्र माने व समस्त पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Shiv Bhojan Kendra started at Gondia ()