शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

जिल्ह्यात एकाच दिवशी सात आत्महत्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 5:00 AM

कोरोनामुळे वृध्दांचा उपचार करण्यासाठी काही खासगी डॉक्टर तयार होत नसल्याने आपल्या म्हातारवयातील आजार व इतर समस्यांना घेऊन वृध्दही आत्महत्या करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात सात ठिकाणी आत्महत्या केल्याच्या नोंदी २८ जून रोजी जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात घेण्यात आल्या आहे.

ठळक मुद्देनैराश्य व तणाव कारण : वृध्दासह तरूण व महिलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूचा थैमान वाढतच चालला आहे. लोक घरातच किती दिवस काढणार असा सवाल उपस्थित करीत आहेत. घरात दोन ते तीन महिने एकत्र राहिल्यामुळे कौटुंबिक कलह निर्माण झाला. कोरोनामुळे वृध्दांचा उपचार करण्यासाठी काही खासगी डॉक्टर तयार होत नसल्याने आपल्या म्हातारवयातील आजार व इतर समस्यांना घेऊन वृध्दही आत्महत्या करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात सात ठिकाणी आत्महत्या केल्याच्या नोंदी २८ जून रोजी जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात घेण्यात आल्या आहे.गोरेगाव तालुक्याच्या घुमर्रा येथील जयवंता गोपीचंद भोसले (७०) ही महिला २७ जून रोजी रात्री ८.१५ वाजता कुटुंबासह जेवण करून आपल्या खाटेवर झोपायला गेली होती. परंतु २८ जूनच्या सकाळी घराशेजारील राहणारे गुणेश्वर जयराम ठाकरे यांच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळला. तिच्या आत्महत्येमागील कारण कळले नाही. सदर घटनेसंदर्भात श्रीचंद गोपीचंद कोसरे (५५) यांच्या तक्र ारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.दुसरी घटना २७ जून रोजी घडली. तिरोडा तालुक्याच्या नेहरू वॉर्डातील जाणसी लक्ष्मी वेणू सिलिवेरी (२४) नेहरू वार्ड शाहूनगर मलपुरी रोड तिरोडा हिचे वेणू कोटय्या सिलिवेरी (२८) याच्यासोबत २०१८ मध्ये लग्न झाले होते. त्यांच्या पत्नीने घरी कुणीही नसताना ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही. तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तिसरी घटना गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टिकायतपूर येथील आहे. सुखराम धनपती लिल्हारे (६४) याने घराजवळील महेंद्र बघेले यांच्या घराजवळील विहिरीत २८ जून रोजी पहाटे ५ वाजता उडी घेऊन आत्महत्या केली. दोन वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता तेव्हापासून त्यांना त्रास असल्यामुळे ते इकडे-तिकडे केव्हाही उठून जायचे.सदर घटनेसंदर्भात गंगाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. चवथी घटना आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील आहे. दयाराम तुकाराम रहिले (७०) याने २२ जून रोजी विष प्राशन केल्यामुळे त्याला उपचारासाठी गोंदियाचे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार घेताना २४ जूनच्या सकाळी ९.५० वाजता त्याचा मृत्यू झाला.सदर घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पाचवी घटना देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया कोयलारी शेंडा येथील आहे. रामचंद्र कानू बोरकर (७०) यांनी २८ जूनच्या सकाळी घराजवळच्या जंगल परिसरातील पळसाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश रामचंद्र बोरकर यांच्या तक्र ारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सहावी घटना तिरोडा तालुक्याच्या चिल्हाटी खुर्द येथील आहे. अमरकला महेंद्र रहांगडाले (२८) या महिलेने २८ जून रोजी दुपारी ३.३० वाजता गावातीलच हंसराज कटारे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मरकलाचे लग्न महेंद्र योगेश्वर रहांगडाले (४०) यांच्यासोबत २०१८ मध्ये रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. तिच्या आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही.सातवी घटना दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया धापेवाडा येथील आहे. नीलकंठ चैनलाल देवगडे (२३) याने २५ जून रोजी विष प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी गोंदियाच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला.सदर घटनेसंदर्भात गवळीवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्या