जिल्ह्यात एकाच दिवशी सात आत्महत्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:01:07+5:30

कोरोनामुळे वृध्दांचा उपचार करण्यासाठी काही खासगी डॉक्टर तयार होत नसल्याने आपल्या म्हातारवयातील आजार व इतर समस्यांना घेऊन वृध्दही आत्महत्या करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात सात ठिकाणी आत्महत्या केल्याच्या नोंदी २८ जून रोजी जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात घेण्यात आल्या आहे.

Seven suicides recorded in the district on the same day | जिल्ह्यात एकाच दिवशी सात आत्महत्यांची नोंद

जिल्ह्यात एकाच दिवशी सात आत्महत्यांची नोंद

googlenewsNext
ठळक मुद्देनैराश्य व तणाव कारण : वृध्दासह तरूण व महिलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना विषाणूचा थैमान वाढतच चालला आहे. लोक घरातच किती दिवस काढणार असा सवाल उपस्थित करीत आहेत. घरात दोन ते तीन महिने एकत्र राहिल्यामुळे कौटुंबिक कलह निर्माण झाला. कोरोनामुळे वृध्दांचा उपचार करण्यासाठी काही खासगी डॉक्टर तयार होत नसल्याने आपल्या म्हातारवयातील आजार व इतर समस्यांना घेऊन वृध्दही आत्महत्या करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात सात ठिकाणी आत्महत्या केल्याच्या नोंदी २८ जून रोजी जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात घेण्यात आल्या आहे.
गोरेगाव तालुक्याच्या घुमर्रा येथील जयवंता गोपीचंद भोसले (७०) ही महिला २७ जून रोजी रात्री ८.१५ वाजता कुटुंबासह जेवण करून आपल्या खाटेवर झोपायला गेली होती. परंतु २८ जूनच्या सकाळी घराशेजारील राहणारे गुणेश्वर जयराम ठाकरे यांच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळला. तिच्या आत्महत्येमागील कारण कळले नाही. सदर घटनेसंदर्भात श्रीचंद गोपीचंद कोसरे (५५) यांच्या तक्र ारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दुसरी घटना २७ जून रोजी घडली. तिरोडा तालुक्याच्या नेहरू वॉर्डातील जाणसी लक्ष्मी वेणू सिलिवेरी (२४) नेहरू वार्ड शाहूनगर मलपुरी रोड तिरोडा हिचे वेणू कोटय्या सिलिवेरी (२८) याच्यासोबत २०१८ मध्ये लग्न झाले होते. त्यांच्या पत्नीने घरी कुणीही नसताना ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही. तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तिसरी घटना गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टिकायतपूर येथील आहे. सुखराम धनपती लिल्हारे (६४) याने घराजवळील महेंद्र बघेले यांच्या घराजवळील विहिरीत २८ जून रोजी पहाटे ५ वाजता उडी घेऊन आत्महत्या केली. दोन वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता तेव्हापासून त्यांना त्रास असल्यामुळे ते इकडे-तिकडे केव्हाही उठून जायचे.
सदर घटनेसंदर्भात गंगाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. चवथी घटना आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील आहे. दयाराम तुकाराम रहिले (७०) याने २२ जून रोजी विष प्राशन केल्यामुळे त्याला उपचारासाठी गोंदियाचे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार घेताना २४ जूनच्या सकाळी ९.५० वाजता त्याचा मृत्यू झाला.
सदर घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पाचवी घटना देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया कोयलारी शेंडा येथील आहे. रामचंद्र कानू बोरकर (७०) यांनी २८ जूनच्या सकाळी घराजवळच्या जंगल परिसरातील पळसाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश रामचंद्र बोरकर यांच्या तक्र ारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सहावी घटना तिरोडा तालुक्याच्या चिल्हाटी खुर्द येथील आहे. अमरकला महेंद्र रहांगडाले (२८) या महिलेने २८ जून रोजी दुपारी ३.३० वाजता गावातीलच हंसराज कटारे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मरकलाचे लग्न महेंद्र योगेश्वर रहांगडाले (४०) यांच्यासोबत २०१८ मध्ये रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. तिच्या आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही.
सातवी घटना दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया धापेवाडा येथील आहे. नीलकंठ चैनलाल देवगडे (२३) याने २५ जून रोजी विष प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी गोंदियाच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला.
सदर घटनेसंदर्भात गवळीवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
 

Web Title: Seven suicides recorded in the district on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.