आमगाव: आमगाव तालुक्यातील मुख्य शहरातील वन जमीनीवर मागील अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेल्या कुटूंबाना कायमचा निवासी आश्रय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे. या आर्थिक दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे रितसर प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. आमगाव शहरातील विविध प्रभागामध्ये झुडपी जंगल जागेवर आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांनी मागील अनेक वर्षापासून कुटूंबासह या जमिनीवर वास्तव्य केले आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेत सहभागी होऊन आर्थिक सबळता मिळविण्यासाठी या कुटूंबाचा संघर्ष सुरू आहे. परंतु या कुटूंबाना शासनाच्या वनहक्क योजनेतून राहणीमान जमिनीचे पट्टे मिळविण्यासाठी सतत पायपीट करावी लागत आहे. शासन परिपत्रकाप्रमाणे झुडपी जंगल परिसरात राहणारे कुटूंबाना पट्टे मिळविण्यासाठी नागरिकांनी अनेकदा अर्ज सादर केले. परंतु या प्रस्तावावर सार्थक पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे या जमिनीवर वास्तव्यात असलेले कुटूंब आजही या भूमिवर निराश्रीतपणे कुटूंबाचे उदरनिर्वाह करीत आहेत. शहरातील विविध प्रभागामध्ये वन झुडपी जंगल परिसरात वास्तव्य करीत असलेले कुटूंबाना कायमचा आश्रय मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर, उत्तम नंदेश्वर, राकेश शेंडे, क्रिष्णा चुटे, रुपकुमार शेंडे, रघुनाथ भुते यांनी पुढाकार घेऊन प्रस्ताव तयार केले. सदर निराश्रीत कुटूंबाना न्याय मिळावा यासाठी ११३ कुटूंबाचे प्रस्ताव रितसर तयार करून तहसीलदार साहेबराव राठोड यांना सोपविण्यात आले. प्रस्तावांवर तातडीने कार्यवाहीतहसीलदार नागरिकांना शासन योजनेअंतर्गत रितसर आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करून शासनाकडे पाठविण्यात येईल. विभागाचे कार्य न्यायपूर्ण असेल, असे आश्वासन तहसीलदार साहेबराव राठोड यांनी दिले आहे.
वननिवासी जमिनीच्या हक्कासाठी शासनाकडे धाव
By admin | Updated: October 28, 2016 01:23 IST