शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

लोक अदालतीत १७३५ प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: December 18, 2014 22:56 IST

न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व पक्षकारांना न्याय मिळावे यासाठी जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय व जिल्ह्यातील इतर न्यायालयांमध्ये राष्ट्रीय

गोंदिया : न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व पक्षकारांना न्याय मिळावे यासाठी जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय व जिल्ह्यातील इतर न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या अदालतीत जिल्ह्यातील १७३५ प्रकरणे निकाली काढण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधीश मु.ग.गिरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत १ हजार ६३ प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यात गोंदिया न्यायालयातील ४९५, तिरोडा न्यायालयातील ३४२, अर्जुनी/मोरगाव न्यायालयातील २५, सडक/अर्जुनी न्यायालातील ३३, आमगाव न्यायालयातील १५३, देवरी न्यायालयातील १५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातील गोंदिया न्यायालयातील ७०, तिरोडा न्यायालयातील १६, अर्जुनी/मोरगाव न्यायालयातील ९, सडक/अर्जुनी न्यायालातील ५, आमगाव न्यायालयातील १२४, देवरी न्यायालयातील ४, सहायक धर्मादाय आयुक्त गोंदिया ६३, कामगार न्यायालय गोंदिया १५, ग्राहक मंच गोंदिया ५ अशी एकूण ३११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. बँक व बीएसएनएलची न्यायप्रविष्ठ असलेले ३६० प्रकरणे निकाली काढण्यात आले. गोंदिया न्यायालयातील १५२, तिरोडा न्यायालयातील ३३, अर्जुनी/मोरगाव न्यायालयातील २०, सडक/अर्जुनी न्यायालातील २१, आमगाव न्यायालयातील १०७, देवरी न्यायालयातील २७ व अन्य एक प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीत विदर्भ कोकण ग्रामीण बँक, बँक आॅफ इंडिका, बँक आॅफ महाराष्ट्र, युनियन बँक, देना बँक, महात्मा फुले सहकारी बँक, इंडस इंड बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया व बीएसएनएल यांचे न्याय प्रविष्ठ असलेले प्रकरणे ठेवण्यात आले होते. दोन्ही पक्षकारांचे ऐकून दोघांना मान्य होईल अशा अटीवर तडजोड करण्यात आली. जिल्ह्यात १५ पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात एक न्यायाधीश, एक वकील एक सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायाधिश आर.जी. अस्मार, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एक एन.एल.शेंडे, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश निखील मेहता, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.एम. सुंदाळे, सह दिवाणी न्यायाधीश, ए, आर, सिंघेल, सहदिवाणी न्यायाधीश व्ही.एम. भगत, मेश्राम, सहायक धर्मादाय आयुक्त रेहपाडे, वर्षा पाटील, सह दिवाणी न्यायाधीश एस.पी. सदाफळे, देवरीचे न्यायाधीश एस.डब्लू ठोंबरे, आमगावचे न्यायाधीश एम.डी. दुधे, आर.के. पुरोहित, अर्जुनी/मोरगावचे न्यायाधीश एम.ब. कारर्लेकर, आर.एस. पातनकर, एड.डी. सावरकर, जिल्हा वकिल संघाचे सर्व तालुक्यातील वकील व कार्यकर्ते उपस्थित होते.या लोक अदालतीत विविध बँकेचे शाखा व्यवस्थापक एस.एन. घोटकर, ए. डब्लू, पालांदुरकर, एस.बी. दमाहे, बी.एन. बोरिकर, एम.एम. सोमवंशी, आर. वाय. राणे, व्ही.एम. शेख, एस.एन. भोंगडे, व्ही.व्ही. मानेकर, ए.जी. चौधरी, आर.एस. ठवरे, एस.एम. अंबुले, एस.जे. राऊत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)