शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

महिला अधिकाऱ्याची रेकी करणारा वरिष्ठ सहायक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:40 IST

मुख्यालय दिले नाही : म्हणे, कारवाई सुरू आहे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ प्रशासन महिला अधिकाऱ्याने आपल्या विभागातील वरिष्ठ सहायकाविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिसांत १ जुलै रोजी गंभीर तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी वरिष्ठ सहायक बी. के. रणदिवे (५२, रा. ठाणा) याच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा नोंद झाल्यानंतर जिल्हा परिषदेने त्याला संबंधित कर्मचाऱ्याला बुधवारी (दि. २) निलंबित केले आहे.

जिल्हा परिषदेतील एका विभागातील ४२ वर्षीय कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी तक्रारीनुसार, दिलेल्या आरोपी वरिष्ठ सहायक बी. के. रणदिवे हे सुरुवातीला कार्यालयीन संवादाच्या निमित्ताने त्या महिलेशी संपर्क साधायचे. 'लहान ताई' अशा संबोधनाने बोलत होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून तो त्यांना वारंवार फोन करीत होता. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून व्यत्यय आणायला सुरुवात केली. हा प्रकार इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही कळला होता. त्याच्या कृत्याने कंटाळलेल्या महिला कनिष्ठ प्रशासन महिला अधिकाऱ्याने याची तक्रार गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनला केली. पोलिसांनी एफआयआर दाखल करताच त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले.

परंतु निलंबनानंतर त्याचे मुख्यालय बदलणे अपेक्षित होते. मात्र, त्याला मुख्यालय अद्याप देण्यात आले नाही. मुकाअ बाहेर असल्यामुळे आल्यानंतर त्याचे मुख्यालय ठरविण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फनिंद्र कुथीरकर यांनी सांगितले.

कार्यालयीन वेळेत सुरक्षा आम्ही करूत्या महिला अधिकाऱ्याला नाहक त्रास झाल्यानंतर तिने या प्रकारासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने सकाळी ९ ते सायंकाळी ६ या काळात कार्यालयात आम्ही तुम्हाला सुरक्षा देऊ, त्यानंतर आम्ही सुरक्षा देऊ शकणार नाही, यासाठी तुम्ही एफआयआर करा, असा सल्ला सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुतीरकर यांनी त्या तक्रारकर्ता महिलेला दिला. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया