कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे गणतंत्रदिनी अर्धनग्न आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:30 AM2021-01-25T04:30:37+5:302021-01-25T04:30:37+5:30

गोंदिया : वीज वितरण कंपनीच्या वतीने भंडारा येथील एजन्सीला मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आल्यानंतर त्याने कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून ...

Semi-naked agitation of contract power workers on Republic Day () | कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे गणतंत्रदिनी अर्धनग्न आंदोलन ()

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे गणतंत्रदिनी अर्धनग्न आंदोलन ()

Next

गोंदिया : वीज वितरण कंपनीच्या वतीने भंडारा येथील एजन्सीला मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आल्यानंतर त्याने कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. अशात जिल्ह्यातील १४७ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (दि.१९) रामनगर येथील वीज कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. पुन्हा कामावर घ्या व भंडारा येथील एजन्सीचे कंत्राट रद्द करा, अशी मागणी या कंत्राटी कर्मचाऱ्यांची असून, अन्यथा गणतंत्रदिनी (२६ जानेवारी) अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशारा या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

जिल्ह्यात वीज वितरण कंपनीत मनुष्यबळ पुरवठा करण्याचे कंत्राट भंडारा येथील ऊर्मिला इलेक्ट्रिकल्स या एजन्सीला देण्यात आले आहे. अशात या कंत्राटदाराने मागील १०-१२ वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या जिल्ह्यातील १४७ कर्मचाऱ्यांना कामावरून केले आहे. तसेच कंत्राटदार नवीन कर्मचाऱ्यांकडून ३५ ते ४० हजार रुपये घेऊन कामावर घेत असल्याचे या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे. कामावरून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (दि. १९) येथील वीज वितरण कंपनीच्या रामनगर परिसरातील विभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. तसेच पुन्हा कामावर घ्यावे व भंडारा येथील एजन्सीला दिलेले कंत्राट रद्द करावे या मागणीला घेऊन या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्य अभियंत्यांची भेट घेतली. मात्र त्यांनी कंत्राटदाराकडे बोट दाखविले आहे, तर दुसरीकडे एमएसईबी वर्कर्स फेडरेशनच्या स्थायी कर्मचाऱ्यांनी मुख्य अभियंत्यांना पत्र देऊन कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाच कामावर घेण्याबाबत पत्र देऊन त्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे, असे असतानाही वीज कंपनीच्या अधिकाऱ्याकडून काहीच सकारात्मकता दिसून येत नाही. अशात आंदोलनात सहभागी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागणी पूर्ण न झाल्यास गणतंत्रदिनी शहरात अर्धनग्न मोर्चा काढणार, असा इशारा दिला आहे.

Web Title: Semi-naked agitation of contract power workers on Republic Day ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.