शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

स्क्रब टायफसचा १९ वा रूग्ण आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:30 IST

सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका वगळता जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत स्क्रब टायफसचे रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांची संख्या आता १९ झाली आहे.

ठळक मुद्देमृतांची संख्या तीन : मृत महिलेच्या बहिणीलाही स्वाईन फ्लू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका वगळता जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत स्क्रब टायफसचे रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांची संख्या आता १९ झाली आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम लेनीटोला-शेंडा येथील सायत्रा श्यामभाऊ मरस्कोल्हे (६३) असे रूग्ण महिलेचे नाव आहे.जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, देवरी व सालेकसा तालुक्यात स्क्रब टायफसने पाय पसरले आहे. फक्त आमगाव तालुक्यातच या आजारचे रूग्ण आढळले नाही. ज्या गावात हे रूग्ण आढळले त्या गावात साथरोग अधिकारी डॉ.बी.आर.पटले व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाय योजना कशा कराव्यात यासंदर्भात मार्गदर्शन करीत आहेत.गोंदिया जिल्ह्यात स्क्रब टायफसच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या खासगी डॉक्टर शासकीय आरोग्य यंत्रणेला देत नाही किंवा शासकीय यंत्रणा त्या खासगी डॉक्टरांकडील रूग्णांची माहिती बरोबर संकलीत करीत नाही. तरिही आतापर्यंत स्क्रब टायफसने तिघांचा मृत्यू झाला असून १६ जण आजारी आहेत. आरोग्य विभागाने पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना केल्या नाहीत. स्क्रब टायफस व स्वाईन फ्ल्यूमुळे जिल्ह्यात दहशत पसरली आहे. या आजारांच्या उपाययोजनेसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे.स्क्रब टायफसच्या मृतांची संख्या तीनसडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम थाडेझरी (कोसमतोंडी) येथील पोलीस पाटील महिला सीमा यशवंत धुर्वे (३४) यांचा स्क्रब टायफसने मृत्यू झाला. त्यानंतर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम केशोरी येथील सुप्रिया देवसाद वट्टी यांचा मृत्यू झाला. तर दन दिवसांपूर्वी शहरातील हनुमान नगरातील राजेंद्र डोमाजी खंगार (६६) यांचाही स्क्र ब टायफसने मृत्यू झाला.स्वाईन फ्लूचा आणखी एक रूग्णस्क्रब टायफसनंतर आता जिल्ह्यात स्वाईन फ्लूची दहशत पसरत आहे. जिल्ह्यात तिघांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आमगाव तालुक्यात स्क्रब टायफस नसले तरी स्वाईन फ्ल्यूने पहिला बळी घेतला आहे. शालीनी निलमचंद्र नंदनवार (४२,रा.ठाणा) असे स्वाईन फ्लूने मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांची बहीण मोनिका मनिराम बारापात्रे (२७) यांनाही स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.‘त्या’ कुटुंबातील १३ लोकांची तपासणीस्वाईन फ्लूमुळे मरण पावलेल्या शालीनी निलमचंद्र नंदनवार (४२) यांच्या माहेरच्या व सासरच्या लोकांची स्वाईन फ्लू तपासणी करण्यात आली. त्या स्वत:च्या घरी असल्यामुळे त्यांच्या पतीकडील ३ व माहेरच्या १० लोकांची चाचणी करण्यात आली. परंतु मोनिका वगळता इतर सर्व निगेटीव्ह असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या लक्षात आले.सात संशयितांना ‘टेमीफ्लू’शालीनी नंदनवार यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यामुळे जे लोक सहा फुटाच्या आत त्यांच्या सहवासात आले त्या १३ लोकांची तपासणी करण्यात आली. परंतु या १३ पैकी सात लोकांना स्वाईन फ्लू होण्याची दाट शक्यता असल्याचा संशय घेत आरोग्य विभागाने सात लोकांना टेमीफ्लू च्या गोळ्या दिल्या आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू