शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परवानगी नसताना सुरू ठेवली विज्ञान शाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:37 PM

येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी यंदा श्री स्वामी विद्यालय व अंजनाबाई पारधी कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव या शाळेमधून परीक्षेस बसणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना टी.सी. सुध्दा डोंगरगाव शाळेमधूनच मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रभारी प्राचार्य कारणीभूत : एका शाळेचे विद्यार्थी दुसºया शाळेच्या नावे परीक्षेला बसणार

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी यंदा श्री स्वामी विद्यालय व अंजनाबाई पारधी कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव या शाळेमधून परीक्षेस बसणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना टी.सी. सुध्दा डोंगरगाव शाळेमधूनच मिळणार आहे. ही आश्चर्यचकीत करणारी बाब असून यासाठी प्रभारी प्राचार्य यू.बी. पारधी कारणीभूत असल्याचे बोलले जाते.सुकडी-डाकराम येथील जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी व बारावीच्या कला शाखेला शासनाची मान्यता आहे. पण विज्ञान शाखा सुरु केली तेव्हा विज्ञान शाखेला शासनाची कोणत्याच प्रकारची मान्यता नव्हती. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.सदर विज्ञान शाखेची तुकडी स्थानिक जि.प. शाळेमध्ये सुरु करण्यात आली. तशा प्रकारचा प्रस्ताव तत्कालीन प्राचार्य ए.झेड. नंदेश्वर यांनी जि.प. गोंदियाच्या शिक्षण विभागाला पाठविला होता. त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर प्रभारी प्राचार्य यू.बी. पारधी यांनी पदभार सांभाळला. पण त्यांनी जि.प. गोंदियाकडे कोणतीच विचारपूस किंवा पाठपुरावा न केल्यामुळे तो प्रस्ताव जि.प. शिक्षण विभागात पडून राहिला.दरम्यान अकरावीनंतर बारावी विज्ञान शाखेचे वर्ग सुरु झाले. दोन वर्ष लोटून सुध्दा विज्ञान शाखेची परवानगी मिळाली नव्हती. ही बाब प्रभारी प्राचार्य यू.बी. पारधी यांना माहीत होती. पण काहीतरी करून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नागपूर बोर्डात जावून विचारपूस केली.त्यावेळी बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे नुकसान न करता तुम्ही जवळच्या शाळेच्या नावाने विद्यार्थी परीक्षेला बसवा, असा सल्ला देण्यात आला. तेव्हा शिक्षण उपसंचालक नागपूर व शिक्षण संचालक पुणे यांना पत्र व्यवहार करुन बारावी विज्ञान शाखेच्या मुलांना तात्पुरती परीक्षा देण्यासाठी मंजुरी देण्यात आली.विद्यार्थ्यांच्या नुकसानीसाठी प्रभारी प्राचार्य जवाबदार असल्याचा आरोप आहे. शाळेमध्ये गटबाजी करणे, मी करेन तो कायदा अशा भूमिकेतून वावरणारे प्रभारी प्राचार्य पारधी यांच्या धोरणामुळे सुकडी-डाकराम येथील विद्यार्थ्यांना डोंगरगाव शाळेच्या नावाने परीक्षा देण्याची वेळ आल्याचा आरोप आहे.बारावीच्या परीक्षा केंद्रासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास मेश्राम, पत्रकार जांभूळकर व प्राचार्य ए.झेड. नंदेश्वर, प्रा.एस.ए. कापगते यांनी मेहनत घेतली. मात्र आता या शाळेला विज्ञान शाखेची परवानगी नसल्यामुळे विज्ञान शाखेचे विद्यार्थ्यांना डोंगरगाव शाळेच्या नावाने परीक्षा बसण्याची वेळ आली आहे.